Rajabhau Waje : खासदार वाजेंचा संयम सुटला, भाजपच्या उदय सांगळेंची केली पोलखोल..नको ते सगळच काढलं..

Rajabhau Waje Vs Uday Sangle : उदय सांगळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली होती.
Rajabhau Waje Vs Uday Sangle
Rajabhau Waje Vs Uday SangleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Sinnar Politics : उदय सांगळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. विधानसभेला महाविकास आघाडीचा धर्म न पाळता राजाभाऊ वाजे यांनी माझ्या विरोधात काम केले. त्यामुळे माझा पराभव झाल्याचा आरोप माजी पंचायत समिती सभापती उदय सांगळे यांनी केला. सांगळे यांच्या आरोपांनंतरही खासदार वाजे शांत राहिले. पण अखेर सिन्नर येथे शुक्रवारी पार पडलेल्या निष्ठवंतांच्या मेळाव्यात वाजेंचा संयम तुटला.

खासदार वाजेंनी उदय सांगळे यांना काही गंभीर सवाल केले आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांनी २०१९ च्या विधानसभेसह २०२४ ची लोकसभा आणि विधानसभा पर्यंत काय काय घडले याबाबत काही दाखले देत सांगळे यांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

खासदार वाजे म्हणाले की, उदय सांगळे यांनी मागील विधानसभा निवडणुकीपासूनच माझ्या बाबत उलटसुलट आरोप करायला सुरुवात केली होती. मात्र, माझ्या स्वभावानुसार काळ या सगळ्याला उत्तर आहे असा विचार करून मी काहीही बोललो नाही. परंतु, परवाच्या भाजप प्रवेशावेळी त्यांनी थेट जाहीररित्या खासदारांनी माझ्या विरोधात काम केलं असा आरोप केला. म्हणून मला खुलासा करणे आवश्यक वाटलं, सर्वप्रथम तर मला तुमच्या सर्टफिकेटची आवश्यकता नाही. जर मला काही करायचंच असत तर मी जेव्हा २०१९ ला पराभूत झालो तेव्हा तुमच्या सौभाग्यवतीनी कोणाकोणाला फोन केले, तुमच्या भावाचे, वडिलांचे काय स्टेटमेंट होते. मी पराभूत झाल्यावर कोण काय बोलले याच भांडवल मला करता आलं असत पण मी केलं नाही.

Rajabhau Waje Vs Uday Sangle
Girish Mahajan : गिरीश महाजन भाजपच्याच मंत्र्याची कॉपी करायला गेले अन् डाव अंगलट आला : संकटमोचकच संकटात

लोक मला येऊन सांगत होते की, भाऊ तुमचा घात झालाय, तो सांगळेंनी केलाय परंतु मी उलट त्या लोकांचीच समजूत घालत होतो की असे काही झाले नाहीये. ते माझ्या सोबतच होते माझा घात नशिबाने केलाय असं मी सांगत होतो असं वाजे म्हणाले.

खासदार वाजे पुढे म्हणाले की, २०१७ साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. ते लोकांना सांगताय की मी माझ्या पैशामुळे अध्यक्ष झालो, राजाभाऊ वाजेचा काहीही संबंध नाही. परंतु, त्यांचे बंधू आणि सोमनाथ वाघ यांनी खरं सांगावं, तसेच दादा भुसे यांच्याकडे गेलो तेव्हा शैलेश नाईक माझ्यासोबत होते त्यांनी देखील खरं सांगावं. पैसे तर नरेंद्रभाऊ दराडे असो की दिलीप काका बनकर असो यांच्याकडे पण होतेच. माझ्याकडे पैसे नसतील पण मी माझी सगळी पुण्याई पक्षश्रेष्टीकडे खर्ची घालून तुम्हाला अध्यक्ष करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. पुढे तुम्ही माझ्याशी संपर्क तोडला. तुम्ही, तुमचे वडील, मातोश्री, भाऊ, सौभाग्यवती माझ्या बद्दल समाजात काय काय बोलत फिरले हे देखील माझ्याकडे आहे. सगळ पुराव्यानिशी माझ्याकडे आहे. मी काय ते मांडू इच्छित नाही असा टोला देखील वाजे यांनी लगावला.

Rajabhau Waje Vs Uday Sangle
Sayaji Shinde : गिरीश महाजनांच्या वाटेत आता अभिनेते सयाजी शिंदे आडवे, कुंभमेळ्यावरुन तापलं नाशिक

माणिकरावांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी गंभीर गौप्यस्फोट करत आरोप केला. १० जुलै २०२३ रोजी उदय सांगळे यांनी नाशिकच्या एका प्राध्यापकांच्या घरी माणिकराव कोकाटे यांची भेट घेत राजाभाऊ वाजे यांच्या विरोधात एक होण्याबाबत प्रस्ताव दिल्याची माहिती वाजे यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, पुढं तुमचं का फिस्कटले मला माहित नाही.

लोकसभेला एअरपोर्टवरून बॅगा अन् पैशाच वाटप

खासदार राजाभाऊ वाजे यांनी आणखी एक मोठा आरोप यावेळी केला. त्यांनी थेट उदय सांगळे यांना सुनावले की, लोकसभा निवडणुकीला मला अचानक उमेदवारी मिळाली. त्यावेळी तुम्ही कोणत्या एअरपोर्टवर जाऊन कोणाकडून पैशाची बॅग घेतली. कोणत्या कोणत्या लोकांना पैसे दिले. माझ्या विरोधात कोणाकोणाला पैसे वाटायला लावले. याची सगळी नोंद माझ्याजवळ आहे. तरीसुद्धा विधानसभा निवडणुकीवेळी तुम्ही आणि तुमचे बंधू माझ्याकडे आले आणि अंधारात वेगळं बोलले आणि विधानसभा निवडणूक झाल्यावर उजेडात जाऊन वेगळं बोलायला लागले. पण, मी काळ हेच याला उत्तर आहे हा विचार करून शांत राहिलो परंतु, तुम्ही परवाच्या भाजपा प्रवेशावेळी खासदारांनी काम केलं नाही असे वक्तव्य केल्याने मला बोलावं लागलं.

Rajabhau Waje Vs Uday Sangle
Suhas Kande : मनमाडचा किंग राजकारणातून आउट, सुहास कादेंनी केला करेक्ट कार्यक्रम

समोरुन लढा..

तुम्हाला कोणाचं राजकारण संपवायच असेल तर ते समोर लढून संपवा. परंतु, कुटील कारस्थान करून, समाजाच्या मनात विष पेरून तुम्ही एखाद्याला कलंक लावताय हे अत्यंत घातक आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही फोडाफोडी केली याच देखील उत्तर जनताच तुम्हाला देईल असे देखील खासदार राजाभाऊ वाजे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com