Rajan Vichare Politics: राजन विचारे म्हणतात, ठाण्यात पक्ष सोडून गेलेले आर्थिक लाभार्थी आणि दोन नंबरचे धंदे करणारे!

Rajan Vichare;Shiv Sena Uddhav Thackeray's Thane stronghold is empty but we stand firm with the torch -अडचणीच्या काळात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या समवेत राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य
Rajan Vichare
Rajan VichareSarkarnama
Published on
Updated on

Rajan Vichare News: शिवसेनेचा जन्म ठाणे येथील आणि सर्वात मोठी गद्दारी ही देखील ठाण्यातच झाली. गद्दारी ठाण्याच्या शिवसेनेला नवीन नाही. मात्र या सर्व वावटळीत देखील माजी खासदार राजन विचारे ‘मशाल’ घेऊन ठामपणे उभे आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निर्धार शिबिर आज येथे सुरू झाले. सुरुवातीलाच आम्ही शिवसेनेत का? यावर पक्षाच्या दोन माजी आणि दोन विद्यमान खासदारांच्या मुलाखती झाल्या. ठाण्याचे राजन विचारे यांनी यावेळी निष्ठा काय असते? याचे विविध दाखले दिले.

Rajan Vichare
Rajabhau Waje Politics: खासदार राजाभाऊ वाजे यांचा शब्द, उद्धव ठाकरे यांच्या निष्ठेशी तडजोड नाही!

माजी खासदार राजन विचारे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी विचारे म्हणाले, ठाण्यात शिवसेनेत पडझड झाली. किंबहुना शिवसेना पूर्वीसारखी राहिलीच नाही. पक्ष सोडून गेले ते सर्व लाभार्थी आणि दोन नंबरचे धंदे करणारे होते.

Rajan Vichare
Arvind Sawant Politics: अनेक संकटे, दबाव, आमिष...तरीही मी शिवसेनेत! अरविंद सावंत यांनी सांगितले कारण...

शिवसेनेला निवडून देणारे मतदार आणि कार्यकर्ते मात्र आजही जिथे होते तिथेच आहेत. गेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या मतांची टक्केवारी देखील हे स्पष्ट करते. आता जे निवडून आले आहेत, ते मतदान यंत्रामध्ये घोटाळे करून निवडून आले आहेत.

श्री विचारे म्हणाले, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा खरा कार्यकर्ता जिथे होता तिथेच आहे. ठाणेकरांचे प्रेम देखील अद्यापही शिवसेनेवर आहे. पैशांचा गैरवापर करून गद्दारी करणारे लोक निवडून आले आहेत. मतदार त्यांना योग्य उत्तर देतील.

अनेक आमदारांनी गद्दारी केली. ठाण्याला गद्दारी नवीन नाही. यापूर्वी सतीश प्रधान, मो. दा. जोशी यांसारखे नेते असताना देखील गद्दारी झाली होती. धर्मवीर आनंद दिघे यांनी तेव्हा ३९ आमदारांचे राजीनामे घेतले होते. त्याचा परिणाम म्हणून ठाण्यात शिवसेना स्वबळावर सत्तेत आली.

धर्मवीर आनंद दिघे हे निष्ठेचे प्रतीक आहेत. आम्हाला त्यांच्याकडूनच निष्ठेचे बाळकडू मिळाले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात 'टाडा'ची कारवाई करण्यात आली. तेव्हा वकील हेगडे यांनी "गद्दारांना क्षमा नाही" हे विधान मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र धर्मवीर दिघे यांनी त्याला स्पष्ट नकार देत, शिक्षा पत्करण्याची तयारी दाखवली होती. आनंद दिघे हे वेगळे रसायन होते निष्ठा काय असते हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

-------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com