Rajabhau Waje News: शिवसेनेचे लोकसभेत नऊ खासदार आहेत. वरचेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशा वावड्या उठतात. मात्र यामध्ये नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे नाव कधीच नसते.
शिवसेनेचे निर्धार शिबिर आज नाशिक येथे सुरू झाले. शिबिराची सुरुवात वेगळ्या पद्धतीने झाली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आम्ही शिवसेनेत का? या विषयावर खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत, राजन विचारे आणि चंद्रकांत खैरे यांची मुलाखत घेतली यावेळी या चारही खासदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी कधीही प्रातारणा करण्याचा विचार मनातही येत नाही, असे स्पष्ट केले.
यावेळी खासदार वाजे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाशी आपले घनिष्ठ नाते आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यावर जवळचे बरेच लोक त्यांच्यासोबत गेले. ही मंडळी वरचेवर येऊन भेटत असे. पक्षांतराचे अमिषा दाखवत होते. मात्र आपण त्यांना दाद दिली नाही.
सिन्नर मतदारसंघातून २००९ च्या विधानसभा निवडणुकीत वडील प्रकाश वाजे यांचा दोन हजार ७००मतांनी निसटता पराभव झाला होता. तेव्हा मी राजकारणात नव्हतो. त्यानंतर अनेकांनी राजकारणात येण्याची सूचना केली. त्यामुळे मी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात आलो,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २०१३ मध्ये भेट घेऊन उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. पक्षप्रमुखांनी त्यावेळी तुम्ही किती दिवस शिवसेनेत राहाल असा प्रश्न केला होता. त्यावर जोपर्यंत उद्धव ठाकरे शिवसेनेत असतील, तोपर्यंत मी शिवसेनेत असेल, असे उत्तर दिले होते. त्यावर आजही आपण ठाम आहोत.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत उमेदवारी केली. शिवसेनेचे उमेदवार म्हणून तेव्हा मी विजयी झालो. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर कुठे गेलो नाही, मी शिवसेनेतच राहिलो.
खासदार वाजे म्हणाले, माझी आजी आजोबा आणि वडील यापासून सगळे राजकारणात राहिले आहे. राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मुळे निष्ठेची तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. राजकारण सोडून प्रसंगी समाजकारण करू मात्र शिवसेना सोडण्याचा विचारही करणार नाही असे त्यांनी सांगितले.
--------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.