Sudhakar Badgujar Politics: शिवसेना ठाकरे पक्षातील उपनेते सुधाकर बडगुजर यांना भाजप नेते म्हणतात, नो एंट्री!

Sudhakar Badgujar BJP Entry Denied: शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक नेत्यांचा कडाडून विरोध.
Sudhakar Badgujar, Uddhav Thackrey & Vilas  Shinde
Sudhakar Badgujar, Uddhav Thackrey & Vilas ShindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेल्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यापुढे राजकीय अडथळे उभे राहिले आहेत. पक्षात नाराज असल्याचे सांगणाऱ्या बडगुजर यांना भाजप प्रवेशाला मोठा विरोध होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे त्यांना पक्षांतराआधीच अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का देण्याची तयारी महायुतीने केली आहे. काही नाराज नेत्यांची साथ देखील त्यांना मिळाल्याने अनुकूल चित्र वाटत होते. मात्र या नेत्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करावा यावरूनच मोठा गोंधळ आणि वाद सुरू झाला आहे.

शिवसेनेचे उपनेते बडगुजर आणि भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. बडगुजर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया लगेचच उमटल्या. आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर हे भारतीय जनता पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न करीत राहिले आहेत. त्यांना पक्षात प्रवेश देण्यास आपला विरोध असेल, असे सांगितले.

Sudhakar Badgujar, Uddhav Thackrey & Vilas  Shinde
BJP vs Congress Sangamner : विखे-थोरात समर्थकांत जुंपली; यावेळी निमित्त ठरलंय ग्रामपंचायत...

शिवसेनेचे उपनेते असलेले सुधाकर बडगुजर हे विधानसभा निवडणुकीत आमदार हिरे यांच्याकडून पराभूत झाले आहेत. नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपच्या हिरे आणि शिवसेनेचे बडगुजर यांच्यात राजकीय वर्चस्ववादाची स्पर्धा आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदार हिरे यांनी बडगुजर यांना पराभूत करून त्याचा वचपा काढला.

Sudhakar Badgujar, Uddhav Thackrey & Vilas  Shinde
Raju Shetti: 'विरोधी पक्षांतील प्रत्येकाची सत्तेत जाण्यासाठी स्पर्धा...'; राजू शेट्टींनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडेच बोट दाखवलं

या पार्श्वभूमीवर श्री. बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. महापालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात ही भेट असल्याचा त्यांचा दावा होता. मात्र ही भेट शहरभर चर्चेचा विषय ठरली. त्याला फोडणी देण्याचे काम बडगुजर यांनी आपण शिवसेना ठाकरे पक्षात नाराज असल्याचे सांगत दिली.

मात्र बडगुजर यांना भाजपचा प्रतिसाद मिळण्याआधीच स्थानिक नेत्यांनी विरोधाचे निशाण फडकवले आहे. शहराध्यक्ष सुनील केदार यांनी बडगुजर यांनी भाजप नेते बावनकुळे यांच्या विरोधात भूमिका घेत त्यांचे चारित्र्य हनन केल्याचा आरोप केला.

अशा नेत्याला भाजपमध्ये प्रवेश देण्याचे काहीच कारण नाही. भाजप स्वबळावर महापालिकेत सत्ता संपादित करणार आहे. त्यामुळे अन्य पक्षातील नाराजांना आमच्या पक्षात जागा मिळू नये यासाठी वरिष्ठांकडे माहिती कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकंदरच शिवसेना ठाकरे पक्षाला लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठापनाला लावली आहे. त्याचा एक भाग म्हणूनच त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहला विशेष उपस्थिती दर्शविली होती. उपस्थितीतून त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला अस्वस्थ करण्यासाठी खेळी खेळली. निमित्ताने शिवसेना ठाकरे पक्षात अस्वस्थता वाढविण्यात महायुतीचे नेते यशस्वी झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com