Rahul Gandhi Bungalow News : राहुल गांधींचा पत्ता पुन्हा बदलणार; काय आहे कारण?

Rahul Gandhi's address change : राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत.
Rahul Gandhi's address change
Rahul Gandhi's address changeSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या आरोपात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुनावण्यात आलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित दिली होती. यानंतर त्यांचे संसद सदस्यपद पुन्हा बहाल झाले होते. सोबतच त्यांना शासकीय निवासदेखील देण्यात आले होते. मात्र आता राहुल गांधी तुघलक लेनच्या जागी दुसऱ्या घराच्या शोधात असल्याची माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi's address change
NCP Leader Threat Extortion : बार्शीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीच्या तालुकाप्रमुखास धमकी देत मागितली खंडणी

राहुल गांधीं यांना मिळालेल्या तुघलक लेन येथील शासकीय निवास आता ते बदलण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा काँग्रेस खासदार राहुल गांधीं यांचा पत्ता पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरून परत आल्यानंतर निवासस्थानाचा निर्णय होणार असल्याचे समजते.

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांना दिले गेलेले तुघलक लेनवरील १२ नंबरचे शासकीय निवासस्थान रिकामे करावे लागले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे त्यांना पुन्हा खासदारकी मिळाल्यानंतर राहुल गांधी आता तुघलक लेनच्या ऐवजी दुसऱ्या घराचा शोध घेत आहेत. काही पर्यायी निवासांची ते पाहणी करत होते. त्यानुसार सफदरजंग लेनवर राहुल गांधींचा पत्ता निश्चित होण्याची शक्यता आहे.

Rahul Gandhi's address change
Loksabha Election BJP Masterplan: आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘मेगा प्लॅन’; लोकसभा-विधानसभा मतदारसंघात 'वॉर रूम' सुरू करणार

गेल्या काही दिवसापासून राहुल गांधी लेह लडाखच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावरून आल्यानंतर निवासस्थानाचा निर्णय होणार असून, त्यांच्या निवासाची शोध मोहीम वेग घेणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले. (Latest Marathi News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com