

Raksha Khadse On Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी मिळून एकुण १२ जागा बिनविरोध करण्याची रणनीती यशस्वी केली. आता उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे.
महायुतीमधील मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील, रोहित निकम यांच्यासारख्या दिग्गजांच्या जागा बिनविरोध झाल्या. मात्र, मुक्ताईनगरमधून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व चाळीसगाव मधून मंगेश चव्हाण यांना मात्र निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागले आहे.
रक्षा खडसे यांच्या विरोधात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्या देवयानी देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे. मुक्ताईनगरात भाजप-शिवसेना आमने-सामने आले आहेत. मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढवली जात असल्याने कुठेही दगाफटका होऊ नये, अशी अपेक्षा रक्षा खडसे यांनी महायुतीच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केली आहे.
कुठेही दगाफटका होणार नाही. महायुतीचे उर्वरित सगळेजण चांगल्या मतांनी निवडून येतील अशी अपेक्षा असल्याचे रक्षा खडसे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याला महायुतीतील अंतर्गत नाराजीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रक्षा खडसे यांची या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुक्ताईनगरच्या लढतीकडे जिल्ह्याचे लागले असून, त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे नेते एकजूट राखणार की अंतर्गत संघर्ष आणखी वाढणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुक्ताईनगरच्या जाग्यावर सुरुवातीपासूनच तिढा होता. त्यामुळे ही जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरली. शिवसेना शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा बॅंक खडसेमुक्त करण्याचा नारा दिला होता. त्यांनी रक्षा खडसे यांच्या ठरावांवर हरकती घेतल्या होत्या. मात्र, या हरकती फेटाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर महायुती म्हणून निवडणूक लढवायचे ठरले मात्र, रक्षा खडसे यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने माघार घेतली नाही. त्यामुळे रक्षा खडसे या निवडणुकीच्या चक्रव्यूहात अडकल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.