Ramdas Athwale On Fadnavis : रामदास आठवलेंकडून थेट फडणवीसांच्या टीकेला छेद ; म्हणाले,'' पवारांची ती खेळी ही मुत्सद्देगिरीच...''

Maharashtra Political News : '' शरद पवार हे चांगले राजकारणी आणि विचारवंत आहेत...''
Ramdas Athwale , Devendra Fadnavis, Sharad Pawar
Ramdas Athwale , Devendra Fadnavis, Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे -

Ahmednagar: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही बेईमानीने सरकार स्थापन केलं असं राष्ट्रवादीचे लोक म्हणाले होते. त्यामुळे मी त्यांना आठवण करून दिली की, १९७८ साली शरद पवार हे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये मंत्री होते. ते सरकारमधील ४० आमदार घेऊन बाहेर पडले आणि मुख्यमंत्री झाले. त्यांनी तेव्हाच्या भारतीय जनता पार्टीबरोबर सरकार स्थापन केलं होतं.

त्यांना कुणीही बेईमान म्हटलं नाही. त्याला पवारसाहेबांची मुत्सद्देगिरी म्हटलं गेलं. त्यांना कुणी गद्दारी केली असं म्हटलं नाही. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी त्यावेळी पवारांची ती खेळी ही मुत्सद्देगिरीच होती असं विधान करतानाच थेट फडणवीसांच्या भूमिकेलाच छेद दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले(Ramdas Athwale) यांनी मंगळवारी (दि. २७) अहमदनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. आठवले म्हणाले, पवारांची त्यावेळेसची खेळी ही मुत्सद्देगिरीच होती असं मत मांडले. त्यांना काँग्रेस श्रेष्ठींकडून मुख्यमंत्री बनवलं नसतं आणि त्यावेळची एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहून 40 आमदारांसह ते बाहेर पडले आणि त्यांनी पुलोद सरकार बनवलं. या सरकारमध्ये जनता दलासह भारतीय जनता पक्षाचेही नेते सहभागी होते. यात हशु अडवाणी, उत्तमराव पाटील यांचाही समावेश असल्याचं आठवले यांनी विशेष करून नमूद केलं.

Ramdas Athwale , Devendra Fadnavis, Sharad Pawar
Rahul Shevale Defamation Case: ठाकरे, राऊतांची डोकेदुखी वाढणार ? खासदार शेवाळेंच्या मानहानी प्रकरणी न्यायालयाने दिले 'हे' मोठे निर्देश

शरद पवार( Sharad Pawar) हे चांगले राजकारणी आणि विचारवंत आहेत. त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधी, नितीश कुमार यांच्या नादाला लागू नये. मोदीं एवढं चांगलं कार्य करत असताना पवार साहेबांनी त्यांची स्तुती करणे अपेक्षित असताना ते इतरांचे ऐकून पंतप्रधान मोदींवर टीका करण्याचा प्रयत्न करत आहे असं आठवले यावेळी म्हणाले.

1978ला शरद पवार वयाच्या केवळ 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी त्यावेळेस सरकारमधील 40 आमदारांना घेऊन बाहेर पडत तत्कालीन जनसंघ,जनतादल आदीं पक्षांची मोट बांधत पुलोद सरकार स्थापन केले आणि त्यामुळे तत्कालीन वसंतदादा पाटील यांचे काँग्रेसचे सरकार पडले.

Ramdas Athwale , Devendra Fadnavis, Sharad Pawar
Solapur BJP News : होय, मला केसीआर यांची ऑफर,आता विचार करण्याची वेळ; रावांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचे स्पष्ट संकेत

1978ला शरद पवार वयाच्या केवळ 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. त्यांनी त्यावेळेस सरकारमधील 40 आमदारांना घेऊन बाहेर पडत तत्कालीन जनसंघ,जनतादल आदीं पक्षांची मोट बांधत पुलोद सरकार स्थापन केले आणि त्यामुळे तत्कालीन वसंतदादा पाटील यांचे काँग्रेस(Congress) चे सरकार पडले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी नुकतेच एका भाषणादरम्यान 'शरद पवारांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि एकनाथ शिंदे यांनी केली तर ती बेईमानी!! असं कसं चालेल'असं म्हणत एकूणच 1978 साली काँग्रेसमधून जवळपास 40 आमदारांसह बाहेर पडलेले शरद पवारांची त्यावेळची खेळी आणि गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांनीही चाळीस आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडून केलेले बंड वा उठाव यावरून महाविकास आघाडीतून सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारी आणि पन्नास खोके असा होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना फडवणीस यांनी या दोन्ही राजकीय घटनांची सांगड घालत आपले मत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com