Rahul Shevale Defamation Case: ठाकरे, राऊतांची डोकेदुखी वाढणार ? खासदार शेवाळेंच्या मानहानी प्रकरणी न्यायालयाने दिले 'हे' मोठे निर्देश

Maharashtra Politics : 'सामना' या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप....
Rahul Shevale, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Rahul Shevale, Uddhav Thackeray, Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना' या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

'सामना' या मुख्यपत्रातून संजय राऊत(Sanjay Raut) यांनी शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांची बदनामी केली असा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात संजय राऊत तसेच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानी केल्याबाबतचा खटला दाखल केला आहे. ठाकरे व राऊतांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे हे समन्स बजावले आहे

Rahul Shevale, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Uddhav Thackeray Morcha : पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली; ठाकरे गट काय करणार?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख तथा सामनाचे संपादक उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी संपादक संजय राऊत यांना मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स बजावला आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी याचिका प्रकरणात समन्स बजावण्यात आला आहे. मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आलं आहे. दोघांनाही 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दैनिक 'सामना'मध्ये शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) विरोधात प्रसिद्ध करण्यात आलेल्या बदनामी प्रकरणात त्यांनी मुंबई महानगर दंड अधिकारी न्यायालयात मानहानी याचिका दाखल केली होती. या प्रकरणात न्यायालयाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात समन्स जारी केला आहे. तसेच 14 जुलैला हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे ठाकरे आणि राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Rahul Shevale, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Governor Ramesh Bais News : हिंदीसाठी राज्यपालांचा आग्रह, कोश्‍यारींची प्रथा बैस यांच्याकडून खंडित..

न्यायालयात नेमकं काय घडलं?

खासदार शेवाळे यांनी 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेला मूळ लेख पुरावा म्हणून न्यायलयात सादर केला. न्यायालयीन कामकाजादरम्यान असा युक्तिवाद करण्यात आला, शेवाळे यांनी आपले जीवन शिवसेनेसाठी समर्पित केलं आहे. मात्र, खासदार म्हणून खोट्या रिअल इस्टेट दाव्यांमुळे त्यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले आहेत. जर तुम्ही म्हणत असाल की, त्यांचा पाकिस्तानमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे, तर त्याचा अर्थ त्या देशाशी त्याचे चांगले संबंध आहेत. हे अत्यंत अनादरकारक आहे असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला.

न्यायालयाने ट्रॉम्बे पोलिसांना या प्रकरणाचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 अंतर्गत तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पोलिसांनी शेवाळे यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला.

Rahul Shevale, Uddhav Thackeray, Sanjay Raut
Solapur BJP News : होय, मला केसीआर यांची ऑफर,आता विचार करण्याची वेळ; रावांच्या भेटीनंतर भाजप नेत्याचे स्पष्ट संकेत

काय आहे प्रकरण?

सामना या वृत्तपत्रामध्ये आपल्याबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला होता. याविरोधात त्यांच्याकडून मानहानीची याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणात आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलं आहे. येत्या 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे (Uddhav Thckeray) आणि संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com