Ramdas Athawale On J P Nadda: जे.पी. नड्डांच्या 'आरएसएस' संदर्भातील विधान मंत्री आठवलेंनाही खटकलं; म्हणाले, 'एकेकाळी संघाची...'

Ramdas Athawale News: भाजपला (BJP) एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता भाजप सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असं नड्डा म्हणाले होते. यावर आठवले म्हणाले, जे. पी. नड्डा काय बोलले मला माहिती नाही. पण...
J P Nadda, Ramdas Athawale
J P Nadda, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale On J P Nadda: ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी 'आरएसएस' संदर्भात (RSS) केलेल्या वक्तव्यामुळे देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. नड्डांच्या या वक्तव्याचा आधार घेत आता विरोधकांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. विरोधक टीका करत असतानाच मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मात्र याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. नाशिकमध्ये बोलताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं. भाजप यंदाची निवडणूक जिंकेल हा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी आपणाला कॅबीनेट मंत्रीपद मिळणार असल्याचा दावादेखील केला.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, मी शिर्डी लोकसभेसाठी आग्रही होतो. मात्र इथे सदाशिव लोखंडेंना उमेदवारी दिल्यामुळे रिपाईला एकही जागा मिळाली नसली तरी मला राज्यसभेत संधी मिळणारच आहे. यावेळी मला कॅबीनेट मंत्रीपद देण्यात येणार असल्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अन्य नेत्यांनी दिलं असल्याचा दावा आठवले यांनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डांच्या 'आरएसएस'बाबतच्या वक्तव्यावर भाष्य केलं. भाजपला (BJP) एकेकाळी संघाची गरज लागत होती. पण, आता भाजप सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असं नड्डा म्हणाले होते. यावर आठवले म्हणाले, जे. पी. नड्डा काय बोलले मला माहिती नाही. पण गरज नाही, असे मी बोलणार नाही. कारण काही प्रमाणात आरएसएसचाही सहभाग आहे. त्यामुळे आठवले यांनी भाजपच्या यशात आरएसएसचं योगदान असल्याचं कबूल केलं आहे.

J P Nadda, Ramdas Athawale
J P Nadda Statement : प्रादेशिक पक्षांना संपवण्याची भाषा ते 'RSS'ची गरज नाही; नड्डांच्या विधानांनी BJP ची अडचण ?

नेमकं काय म्हणाले नड्डा?

एका मुलाखतीत बोलताना जे.पी नड्डा म्हणाले, "सुरुवातीच्या काळात आम्ही अक्षम असू, थोडे कमी पडत असू. तेव्हा आम्हाला आरएसएसची (RSS) गरज पडत होती. आज आम्ही मोठे झालो आहोत. सक्षम आहोत. त्यामुळे भाजप स्वत:चा कार्यभार स्वत: सांभाळते. आमच्या पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात. आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो आणि हेच राजकीय पक्षांनी करायला हवं."

(Edited By Jagdish Patil)

J P Nadda, Ramdas Athawale
J P Nadda News: काशी-मथुरा मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपची माघार? धार्मिक नव्हे तर 'या' मुद्द्यावर निवडणूक लढवणार; जे.पी. नड्डांचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com