

Latest News on Ramgiri Maharaj Controversy : सरला बेटावर सुरू असलेल्या ‘श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताहा’ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
यावेळी रामगिरी महाराजांना मिळत असलेल्या धमक्यांचा मुद्दा उपस्थित झाला. फडणवीस आणि शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या सुरक्षेबाबत आक्रमक भूमिका घेत धमकी देणाऱ्यांना कठोर इशारा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना थेट इशारा दिला. काही लोक रामगिरी महाराजांकडे धमक्या पाठवतात. अशा प्रकारे कुणी धमकी देण्याचे काम केले, तर त्याला नेस्तनाबूत करून टाकू. आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही, हे लक्षात ठेवा, असे फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांनी पुढे आपल्या भूमिकेला जनतेचे पाठबळ असल्याचे सांगितले. आपण निवडलेल्या सन्मार्गावरून कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही, असा सूचक संदेशही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही रामगिरी महाराजांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली. हे सरकार संतांच्या आशीर्वादाने आलेले आहे. संतांचे संरक्षण करण्यासाठी सरकार खंबीर आहे. रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमातील भाषणांमध्ये फडणवीस आणि शिंदे यांनी शेतकरी कर्जमाफी आणि थकीत वीजबिल माफीचाही उल्लेख केला. सरकार कामगार, शेतकरी, कष्टकरी, गरीब, दलित आणि आदिवासी अशा सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकरी आणि बळीराजाचा आहे, असे सांगताना एकनाथ शिंदे यांनी शेतकरी कर्जमुक्तीच्या दुसऱ्या हप्त्याचा उल्लेख केला. हा हप्ता वर्ग करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या चर्चांवरही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. कोणी कितीही आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.