Ratan Tata: टाटा प्रेमींची वेदना, 'रतन टाटांची ती स्मृती संवर्धनात नाशिक महापालिका ठरली कमनशिबी'

Ratan Tata Sanctions Botanical Garden Under CSR project for Nashik: नाशिक महापालिका अनेक चांगल्या उपक्रमांचे संवर्धन करू शकलेली नाही, त्यात रतन टाटांचा देखील एक संदर्भ आहे.
Ratan Tata, Raj Thackeray & Ashok Murtdak
Ratan Tata, Raj Thackeray & Ashok MurtdakSarkarnama
Published on
Updated on

Ratan Tata News: उद्योगमहर्षी रतन टाटा यांच्याशी संबंधित एक स्मृती नाशिक शहरात उभारण्यात आली होती. त्यासाठी स्वतः रतन टाटा यांनी नाशिकला हजेरी लावली होती. त्यामुळे तो प्रकल्प नाशिककरांसाठी संवेदनशील आणि चर्चेचा विषय होता.

उद्योगमहर्षी आणि सबंध भारतीयांच्या दृष्टीने एक हळवे नाते असलेले रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रतन टाटा यांच्याशी संबंधित विविध आठवणी, प्रकल्प, वेगळे उपक्रम आणि स्मृति चर्चेत आल्या आहेत. यामध्ये नाशिक शहराचा देखील उल्लेख होतो.

नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. त्यावेळी पारंपारिक वाट सोडून राज ठाकरे यांनी शहराच्या नावलौकिकतभर टाकतील असे काही उपक्रम केले होते. त्यासाठी महापालिकेचा निधी वापरण्यात आला नाही.

या प्रकल्पांमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर बुद्ध लेणीच्या पायथ्याशी वनविभागाच्या नेहरू उद्यानात एक बोलके झाड कार्यान्वित करण्यात आले होते. त्यासाठी टाटा फाउंडेशन तर्फे सामाजिक दायित्व म्हणून बारा कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता.त्याचे लोकार्पण करण्यासाठी रतन टाटा स्वतः नाशिकला आले होते.

Ratan Tata, Raj Thackeray & Ashok Murtdak
Manoj Jarange News : जरांगेंविरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; डॉक्टरच्या तोंडाला फासलं काळं

एखाद्या महापालिकेला रतन टाटा यांनी भेट देण्याचा आगळा प्रसंग म्हणून त्याची नोंद होते. हा प्रकल्प अतिशय वेगळा होता. अल्पावधीतच तो लोकप्रिय देखील झाला होता. त्यासाठी राज ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मात्र त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. त्या काळात ह्या प्रकल्पाची दुरावस्था झाली. त्याचे जतन आणि देखभाल महापालिका प्रशासनाला करता आले नाही. त्याबाबत नागरिकांमध्ये अनेक संताप व्यक्त करण्यात आला आहे.

प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही. उद्योग महर्षी रतन टाटा यांचा व्यक्तिगत सहभाग असलेली आणि त्यांनी स्वतः लक्ष घालून मदत केलेल्या उपक्रमाचे संवर्धन नाशिक महापालिकेला करता आले नाही.

Ratan Tata, Raj Thackeray & Ashok Murtdak
Shivsena Politics : मुख्यमंत्री शिंदेंच्या समोरच महायुतीतील गटबाजी उघड; वीरेंद्र मंडलिकांच्या उमेदवारीसाठी बॅनर झळकले

त्याची खंत सर्वच रतन टाटा प्रेमी आणि नाशिककर करतात. या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. २०१७ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला होता. राज ठाकरे यांच्या विशेष आग्रहातून रतन टाटा तेव्हा नाशिकला आले होते. नागरिकांनाही भेटले होते. त्याच्या स्मृती आता अनेकांच्या डोळ्यापुढे तरळल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com