Shivsena Politics : मुख्यमंत्री शिंदेंच्या समोरच महायुतीतील गटबाजी उघड; वीरेंद्र मंडलिकांच्या उमेदवारीसाठी बॅनर झळकले

Assembly election 2024 Shivsena Politics Eknath Shinde Virendra mandlik : कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आलेल्या बॅनरवर 'चेहरा नवा वीरेंद्र मंडलिक हवा' अशा आशयाचा मजकूर होता. मात्र, या प्रकरामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर गटबाजी उघड झाली.
 Shivsena Politics Eknath Shinde
Shivsena Politics Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Shivsena Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी गारगोटी भुदरगड विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री आमदार प्रकाश आबिटकर यांच्या कार्यक्रमात येत असताना त्यांच्यासमोरच महायुतीमधील गटबाजी उघड झाली.

कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांनी वीरेंद्र मंडलिक यांच्या उमेदवारीची मागणी केली. मुख्यमंत्री कार्यक्रम स्थळी येताच वीरेंद्र मंडलिक यांच्या उमेदवारी मागणारे बॅनर झळकवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे पाहत स्मित हास्य केले.

कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आलेल्या बॅनरवर 'चेहरा नवा वीरेंद्र मंडलिक हवा' अशा आशयाचा मजकूर होता. मात्र, या प्रकरामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महायुतीतील अंतर्गत गटबाजी उघड झाली.

दरम्यान, माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी कागल-उत्तर-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

 Shivsena Politics Eknath Shinde
Majalgaon Assembly Constituency 2024 : अजित पवारांची साथ देणाऱ्या सोळंकेंच्या विरोधात शरद पवारांची तुतारी कोण वाजवणार ?

मुश्रीफांना विरोध?

मंगळवारी मेळावा पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांसह वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारापेक्षा महायुतीचेच उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रोष असल्याचे दाखवून दिले. मंडलिक यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर गावागावातील मंडलिक प्रेमी आता मुश्रीफ आणि घाटगे यांच्या विरोधात उघड उघड रस्त्यावर उतरलेले आहेत. महायुतीकडून आपल्याला उमेदवारी द्यावी आणि आता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी थांबावे असं जाहीर आव्हान देत वीरेंद्र मंडलिक यांनी महाविकास आघाडीसह महायुतीचे संभाव्य उमेदवारांना टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

 Shivsena Politics Eknath Shinde
Haryana Election Result : हरियाणातील निवडणुकीत चालले नाहीत तीन 'लाल'; मुलगा, नातू, पणतू, जावई सगळेच होते रिंगणात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com