Ravindra Gavit : आधी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ अन् दोनच दिवसांत भाजपलाही ‘राम राम’..!

BJP - Shivsena : राजापूरचे सरपंच रवींद्र गावित यांची दोन दिवसांतच घरवापसी
Ravindra Gavit
Ravindra GavitSarkarnama

Nandurbar News : तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेला (शिंदे गट) ‘जय महाराष्ट्र’ करत नंदूरबारमधील राजापूरचे सरपंच रवींद्र गावित यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेची आक्रमकता अंगात असलेल्या गावित यांची लगेचच भाजपमध्ये घुसमट होऊ लागल्याने, ते आपल्या सर्व समर्थकांसह स्वगृही परतले आहेत.

अवघ्या दोनच दिवसांत त्यांनी भाजपला(BJP) ‘राम राम’ ठोकला. खोटी आश्वासने देऊन जनतेला गृहीत धरता येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया गावित यांनी दिली. त्यामुळे हा भाजपचे नेते व नंदूरबार जिल्ह्यावर पकड असलेल्या आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना मोठा धक्का माना जातो. सध्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदे गावित यांच्या कुटुंबात आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravindra Gavit
Sanjay Raut News : गुजरातला सोन्याने मढवा, त्याची द्वारका करा पण...

नंदुरबार तालुक्यातील राजापूरचे सरपंच रवींद्र गावित शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते होते. आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित(Vijayakumar Gavit) यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वीच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. विविध कामे होतील या प्रलोभनाने आपण भाजपमध्ये प्रवेश केला होता, असं ते म्हणाले.

मात्र शुक्रवारी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सरपंच रवींद्र गावित यांनी पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी त्यांचे स्वागत केले.

Ravindra Gavit
Vidarbh Protest : वेगळ्या विदर्भासाठीच्या बेमुदत आंदोलनाकडे प्रशासनाची पाठ, पदाधिकाऱ्यांची प्रकृती खालावली

पंचायत समिती सभापती दीपमाला भिल, शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंग वळवी, गोपीचंद पवार, शिवसेनेचे(Shivsena) तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, पंचायत समितीचे माजी सभापती माया माळसे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबू पाडवी, पंचायत समिती सदस्या अंजना वसावे आदी यावेळी उपस्थित होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com