Sanjay Raut News : महायुतीचे सरकार राज्यात आल्यापासून महाविकास आघाडीकडून सातत्याने महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून नेले जात असल्याची टीका करण्यात येत आहे. आज पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत केंद्र सरकार दरोडेखोरी करत असल्याची टीका केली.
पुणे (Pune) येते पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महायुती (Mahayuti) चे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामधून गुजरातमध्ये प्रकल्प पळवून नेले. तरी देखील मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत. परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहे तर दोघेही खोटारडे आहेत. हे सरकार आल्यापासून दरोडेखोरी करून गुजरातला 17 प्रकल्प घेऊन गेले आहेत.
केंद्र सरकारच्या दहशतीखाली उद्योगपतींना घेऊन चालले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईची वाट लावण्याचे सरकारचे धोरण आहे. केंद्र सरकारने सगळे सोने घेऊन गुजरातला सोन्याने मढवावे, गुजरातची द्वारका करावी, पण त्यासाठी महाराष्ट्र का लुटत आहात ? आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळवून नेला जात आहे, असा सवाल राऊत यांनी केला.
राऊत पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्या ही पंतप्रधानांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाचार झाले असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात केंद्र सरकारच्या विरोधात बोलण्याची ताकद नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यांनी उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलावे. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनामध्ये होते ना, तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता, मग सांगा ना की राज्यातून एकही प्रकल्प बंद होऊ देणार नाही. ठाण्यात मोठी रेव्ह पार्टी पकडण्यात आली. साध्याचे सरकार हे रेव्ह पार्टीमधूनच निर्माण झाले आहे. सबंध महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे हे सरकारच्या लक्षात येत नाही का ? असा सवाल करा.
येथून गुजरातला उद्योग जात आहेत आणि तिथून अमली पदार्थ महाराष्ट्रात येत असल्याची टीका राऊत यांनी केली. गेल्या काही वर्षांमध्ये देशभरामध्ये गुजरात मधूनच अंमली पदार्थांचा व्यापार केला जात असून गुजरात हे अमली पदार्थांचा कॅपिटल झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवरती आल्यानंतर या सगळ्या गोष्टी वाढल्या असल्याची टीका राऊत त्यांनी केली.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.