शेतकऱ्याच्या अर्धवट जळालेल्या नोटा बदलून मिळाल्या!

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यासाठी पाठपुरावा केला.
MLA Mangesh Chavan with burn notes
MLA Mangesh Chavan with burn notesSarkarnama
Published on
Updated on

चाळीसगाव : पोहरे (Jalgaon) येथील एका शेतकऱ्याच्या (Farmers) घरात गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत दागदागिन्यांसह साडेसात लाखांची रक्कम जळून खाक झाली. यात तीन लाखांहून अधिक नोटा या अर्धवट जळालेल्या होत्या. त्यावर आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी जळालेल्या नोटा बदलण्यासाठी मुंबई - नागपूर रिझर्व्ह बॅंकेच्या (RBI) तब्बल पाच महिने फेऱ्या मारल्या. त्यानंतर ही रक्कम संबंधित कुटुंबीयांना मिळाली. (Farmers given thanks to MLA Mangesh Chavan)

MLA Mangesh Chavan with burn notes
खासदार हेमंत गोडसे राजीनामा द्या; पुन्हा निवडून येऊन दाखवा!

तालुक्यातील पोहरे येथील शेतकरी केशव राघो माळी महाजन यांच्या घरात अचानक गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या आगीत दागदागिन्यांसह साडेसात लाखांहून अधिक रोकड मुद्देमाल जळून खाक झाला होता. त्यापैकी ३ लाख रुपयांच्या नोटा या अर्धवट जळाल्या होत्या. महाजन यांनी एकेक रुपया आपल्या घामातून, कष्टातून कमावले होते.

MLA Mangesh Chavan with burn notes
ओबीसी आरक्षण; महाविकासचे ९९ तर फडणवीसांचे १ टक्का योगदान!

या घटनेने क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार चव्हाण यांनी २८ फेब्रुवारीला महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेल्या व्यथा ऐकून आमदार मंगेश चव्हाण यांचे मन हळहळले. याच वेळी आमदार चव्हाण यांनी आगीत अर्धवट जळालेल्या नोटा स्वतः रिझर्व्ह बँकेतून बदलवून आणेल, असे आश्वासन देऊन त्या नोटा ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी जळालेल्या नोटा बदलून आणण्यासाठी मुंबई - नागपूर रिझर्व्ह बँकेच्या चकरा मारल्या. आमदार चव्हाण यांनी आपल्या कार्यालयामार्फत कागदासह प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सातत्याने ते पाठपुरावा करीत राहिले.

तब्बल पाच महिन्याच्या पाठपुराव्यानंतर त्यांना यश आले आहे. नुकतीच पोहरे येथील शेतकरी केशव राघो माळी यांच्या खात्यात रिझर्व्ह बँकेतर्फे तीन लाख रुपये वर्ग केले आहे. याबाबत त्यांना कल्पना नसल्याने आमदार चव्हाण यांच्या कार्यालयातून पैसे आल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. तेव्हा पैसे खात्यात जमा झाल्याचे दिसून आले.

याबाबत आमदार चव्हाण यांचे सरपंच काकासाहेब माळी (पोहरे ग्रामपंचायत), भाजप बूथप्रमुख पंजाबराव अहिरराव, मोहन जाने, नाना साबळे, महारू महाजन, गोकुळ माळी, प्रकाश बागूल, सुरेश महाजन, राजू माळी, रावसाहेब माळी, सोमनाथ माळी, रामदास जाने यांच्यासह पोहरे ग्रामस्थांसह तालुक्यातील माळी समाजाने आभार मानले आहेत.

---

आगीमुळे आयुष्यभर कमावलेली पुंजी जळून खाक झाली. तेव्हा आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नव्हता. परंतु आमदार मंगेश चव्हाण यांनी आधार दिला व अर्धवट जळालेले पैसे बदलून मिळाले.

- केशव माळी,

पीडित शेतकरी, पोहरे, ता. चाळीसगाव

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com