Nashik Kathe Galli Dargah : पंधरा दिवसांत अतिक्रमण काढावेच लागणार, दर्ग्याच्या विश्वस्तांकडे आता काहीच पर्याय नाही?

Nashik Municipal Corporation : १५ दिवसांत अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. नाशिक महापालिकेने दर्ग्याच्या भिंतीवरच ही नोटीस लावली आहे.
Nashik Kathe Gali Dargah
Nashik Kathe Gali DargahSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकच्या काठे गल्ली सिग्नल परिसरातील सातपीर दर्ग्याला नाशिक महापालिकेने नोटीस बजावली आहे. १५ दिवसांत अतिक्रमण काढून टाका अन्यथा कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सातपीर दर्गा अनधिकृत असल्याचा उल्लेख महापालिकेच्या नोटीस मध्ये आहे. नाशिक महापालिकेने दर्ग्याच्या भिंतीवरच ही नोटीस लावली आहे.

द्वारका भागातील काठे गल्ली सिग्नलजवळील जागेवर सातपीर दर्गा हे धार्मिक स्थळ तयार करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर २३ फ्रेब्रुवारीला नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या दर्गा भोवतीचे काही अतिक्रमण काढले होते. त्यानंतर सातपीर दर्गा ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावनीत न्यायालयाने हा दर्गा अनधिकृत असल्याचे निरीक्षण नोंदवले. त्यानुसार महापालिकेने नोटीस बजावून १५ दिवसांत संपूर्ण अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची सूचना केली आहे.

Nashik Kathe Gali Dargah
Bihar Politics: निवडणुकीपूर्वी काँग्रेसचं दलित कार्ड; नव्या नियुक्तीत जातीय समीकरणं, अल्पसंख्यांना किती स्थान?

पंधरा दिवसांत ट्रस्टने स्वत:हून बांधकाम काढले नाही तर, पालिका हे बांधकाम काढून घेईल अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान दर्ग्याचे विश्वस्त वक्फ बोर्डाकडे धाव घेतील का? अन्य काही कायदेशीर पर्याय त्यांच्याकडे आहे का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने विश्वस्तांकडून चाचपणी केली जावू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिक महानगरपालिकेने दर्ग्याच्या ट्रस्टींना दिलेला अल्टिमेटम बघता दर्ग्यावरून नवा वाद होण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय ?

१५ दिवसांत अनधिकृत बांधकाम काढून न घेतल्यास मनपाने अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. मनपाने दर्ग्याच्या भिंतीवर लावलेल्या नोटीस मध्ये म्हटलं आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, नाशिक महापालिका क्षेत्रातील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी ४ मार्च २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार हजरत सैय्यद सात पीर बाबा दर्गा जनरल वैद्य नगर, काठे गल्ली, नाशिक हा दर्गा 'ब' वर्ग अनधिकृत धार्मिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

यानुसार हे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई मनपामार्फत लवकरच सुरु करण्यात येणार असून तत्तपूर्वी संबंधितांनी सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ स्वत:हून सदरील नोटीस चिकटवल्यापासून १५ दिवसांच्या आत काढून घ्यावे, अन्यथा महापालिकेमार्फत १५ दिवसांनंतर कोणत्याही क्षणी, कोणीतीही पूर्व सूचना न देता सदरचे अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यात येईल, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी या दर्ग्याचा काही भाग महापालिकेकडून हटविण्यात आला होता. त्यावेळेला मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता तर संपूर्ण बांधकाम काढून टाकण्याचा इशारा देण्यात आल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यातील नागरिकांचे या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे. हे प्रकरण पुढे काय वळण घेते हे पाहावे लागणार आहे.

Nashik Kathe Gali Dargah
Shivsena UBT Politics: जळगावच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंनी गटबाजी वरून खडसावले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com