Karnataka Result News : स्थानिक अँटी इनकमबन्सीमुळे हा निकाल लागला असावा!

लवकरच वैफल्यग्रस्त संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल.
Dr. Radhakrishna Vikhe Patil
Dr. Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Karnataka result 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल काहीही लागला तरी त्याचा भाजपवर फार मोठा परिणाम होणार नाही. स्थानिक अँटी इनकमबन्सी मुळे हा निकाल लागला असावा, असे मत राज्याचे महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली. (Karnataka Election result is a impact of anti incumbancy)

महसूल मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe-patil) यांनी कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आपले मत व्यक्त केले आहे. भाजपचा (BJP) पराभव स्थानिक विषयांमुळे झाला, असा दावा केला आहे.

Dr. Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar Politics : भुजबळ विरोधकांच्या दारी, अजित पवारांची दोन तास हजेरी!

डॉ. विखे पाटील आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, सध्याचे हे निकाल सुरवातीचे येत आहेत. दुपारपर्यंत संपुर्ण चित्र स्पष्ट होईल. आता जे निकाल येत आहेत त्यात खूप फरक नाही. खूप मोठा फटका पक्षाला नाही. पूर्ण निकाल आल्यावर चर्चा त्यावर होईल.

स्थानिक राज्याचे निवडणुकांचे विषय वेगळे असतात. केंद्र सरकारशी त्याला जोडणे बरोबर नाही. हे निकाल कदाचीत अँटी इन्कमबन्सीचा परिणाम असावा. संपूर्ण निकाल हाती आल्यावर त्यावर केंद्रीय नेतृत्वाची प्रतिक्रया येईल.

Dr. Radhakrishna Vikhe Patil
Sanjay Raut : शिंदे सरकारचे आयुष्य जास्तीत जास्त ९० दिवसच!

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत राज्य सरकारवर केलेल्या आरोपांबाबत ते म्हणाले, संजय राऊत यांना पोपटपंची करण्याची जवाबदारी त्यांच्या पक्षाने दिली आहे. त्यांनी आपल्या पात्रतेपेक्षा अधिक बोलू नये, असा चिमटा त्यांनी घेतला. त्यांमुळे राऊत यांच्यासारख्या भाडोत्री माणसावर काय काय भाष्य करणार. ते काहीही म्हटले तरीही राज्यातील सरकार पडणार नाही. राऊत यांची भविष्यवाणी कधीही खरी झालेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. पुढे जाऊन त्यांचा पक्ष त्यांच्याबाबत काय करेल माहिती नाही. या वैफल्यग्रस्त झालेल्या माणसावर काही दिवसांनी त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com