Radhakrishna Vikhe Patil : 'या' प्रश्नावर विखे पाटलांनी टोचले केंद्रातील भाजप सरकारचे कान!

Sharad Pawar Vs Vikhe Patil: राज्यात सध्या अनेक पक्षांचे मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे. राज्याचे महसूल मंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपचा मेळावा नाशिक येथे होत आहे.
Radhakrishna Vikhe patil
Radhakrishna Vikhe patil Sarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar Vs Vikhe Patil : लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यातीचा प्रश्न गाजला. तो अद्यापही कायम आहे. यावर आज राज्याचे महसूल मंत्री विखे पाटील यांनीही आपली भूमिका मांडली आहे. राज्याचे महसूल मंत्री डॉक्टर विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज भाजपचा मेळावा नाशिक येथे होत आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांची चर्चा करताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे काही अपेक्षा व्यक्त केल्या. याबाबत आपण स्वत: वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा करू, असे ते म्हणाले.

कांद्याच्या प्रश्नावर दोन मतप्रवाह आहेत, असे विखे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, कांदा निर्यात खुली झाली पाहिजे. कांद्यावरील निर्यात शुल्क मागे घेतले पाहिजे. मात्र, त्याचवेळी शेतकऱ्यांना योग्य भाव देखील मिळाला पाहिजे, अशी व्यवस्था करावी लागेल.

सध्या शेतकर्‍यांकडे कांदा उपलब्ध आहे. केंद्र शासनाने पाच लाख टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कांदा निर्यात केला जात नाही. शेतकर्‍यांकडे कांदा बाजारात कसा येईल, याबाबतचे धोरण राबवावे लागेल.

Radhakrishna Vikhe patil
NCP Vs BJP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या आमदाराचा केला 'करेक्ट कार्यक्रम'; संतप्त आमदार म्हणाले, "गद्दार यशस्वी होत नाहीत..."

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम व्यापाऱ्यांनी करू नये. शेतकर्‍यांकडे सध्या कितीतरी कांदा उपलब्ध आहे. हे देखील पाहिले पाहिजे असे विखे पाटील यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत कांदा निर्यात बंदी असल्याने शेतकरी संतप्त होते. कांद्याचे भाव कोसळण्याचे ते एक प्रमुख कारण होते. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) आधी शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला होता.

या विषयावरून विरोधकांनी भारतीय जनता पक्षाला घेरले. त्यावर राजकारण तापले. त्याचा फायदा भाजप विरोधकांना झाला, हे लपून राहिलेले नाही.

Radhakrishna Vikhe patil
MLA Prajakt Tanpure : आमदार तनपुरे पाटबंधारेच्या कारभारावर संतापले; वाबोंरी चारीवरून सत्ताधाऱ्यांना सुनावले

महाराष्ट्रातील (Maharashtra) सहा ते सात लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराभूत झाले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर हा प्रश्न पुन्हा मागे पडला होता. अद्यापही शेतकर्‍यांच्या भावना या विषयावर तीव्र आहेत. सध्या कांद्याचे दर खाली आले आहेत. याबाबत विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारकडे निर्यात बंदी उठविण्याची मागणी केली जात आहे. अशा स्थितीत राज्याच्या महसूल मंत्र्यांनी या विषयावर पुन्हा एकदा केंद्र शासनाचे लक्ष वेधले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील भाजप सरकार ते किती गांभीर्याने घेते, याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com