NMC News : तीन महिन्यांनी मिळाले आयुक्त, हे आयुक्त नवे महापालिका आयुक्त!

Nashik Municiple corporation got Commissioner after three month- डॉ. अशोक करंजकर नाशिक महापालिकेचे नवे आयुक्त झाले.
Dr. Ashok Karanjkar
Dr. Ashok KaranjkarSarkarnama
Published on
Updated on

NMC news : गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या महापालिकेच्या आयुक्तपदी डॉ. अशोक करंजकर यांची काल नियुक्ती झाली. गेले तीन महिने हे पद रिक्त होते, गेल्या आठवड्यातच येथे प्रभारी आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांच्यासाठी मात्र ती नियुक्ती अल्पकालीन ठकली. (Dr. Ashok Karanjkar posted as NMC commissioner)

नाशिक (Nashik) महानगरपालिकेच्या (NMC) आयुक्तपदी काल राज्य शासनाने डॉ. करंजकर यांची नियुक्ती केली. ते राज्य कामगार विमा सोसायटीचे आयुक्त म्हणून काम पहात होते.

Dr. Ashok Karanjkar
Collector Transfer : जलज शर्मा झाले नाशिकचे नवे जिल्हाधिकारी!

महापालिकेत गेल्या दिड वर्षापासून निवडणुका नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. गेल्या महिन्यात भाग्यश्री बाणायत यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता. गेल्या दिड महिन्यांपासून महापालिकेत प्रभारी आयुक्त म्हणून त्या काम पहात होत्या. त्यांची नियुक्ती मात्र अल्पकालीन ठरली.

श्री. करंजकर यांची नियुक्ती पालकमंत्री दादा भुसे यांच्या शिफारशीने झाल्याचे बोलले जाते. यापूर्वी गिरीश महाजन आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या सल्ल्याने महापालिका आयुक्तांची नियुक्ती करण्यात येत होती. त्यांच्याकडून नाव सुचविल्यावर नियुक्ती केली जात होती, अशी चर्चा आहे. सध्या मात्र पालकमंत्री दादा भुसे यांनी ही नियुक्ती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते.

Dr. Ashok Karanjkar
Raj & Amit Thackeray News : 'शिवतीर्थ'च्या मनात नक्की काय ? राज ठाकरेंपाठोपाठ अमितही भाजपवर तुटून पडले

गेल्या सात वर्षांपासून नाशिक महापालिकेत एकाही आयुक्तांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. सातत्याने शासनाकडून आयुक्तपदी विविध नियुक्त्या करण्यात आल्या. २०१६ मध्ये डॉ. प्रवीण गेडाम, त्यानतंर २०१७ मध्ये अभिषेक कृष्णा, २०१८ मध्ये तुकाराम मुंढे, त्यानंतर राधाकृष्ण गमे, कैलास जाधव, रमेश पवार, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार अशा विविध आयुक्तांनी महापालिकेत आयुक्त पादवर काम केले. यातील एकालाही आपला कार्यकाळ पुर्ण करता आला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com