Rohini Khadse Politics: धक्कादायक; रोहिणी खडसे म्हणतात, ‘निकालाआधीच मिळणारी मते कशी सांगितली’

Rohini khadse; How the opposition candidate announced the number of votes before the result?-मुक्ताईनगर मतदारसंघातील सत्ताधारी उमेदवाराने निकाला आधीच त्यांना किती मते मिळणार, हे सोशल मीडियावर सांगितल्याचा दावा
Rohini Khadse & Chandrakant Patil
Rohini Khadse & Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs Shivsena News: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. आता सरकार स्थापनेचा वाद मिटविण्यात सत्ताधारी व्यस्त आहेत. या सर्व स्थितीत सत्ताधारी आमदारांच्या विजयाबाबत अनेक दावे प्रति दावे केले जात आहेत.

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांसह विविध नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने वरिष्ठ नेत्यांनी ईव्हीएम मशीनची विश्वासार्हता उपस्थित केली आहे. ईव्हीएम मशीन विषयी अनेकांनी संशय व्यक्त करीत, आंदोलनाची तयारी देखील सुरू केली आहे.

Rohini Khadse & Chandrakant Patil
Aamshya Padvi Politics: एकनाथ शिंदे यांच्या `या` आमदारासह १०० जणांविरोधात पोलिसांची कारवाई...

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी धक्कादायक दावा केला आहे. रोहिणी खडसे मुक्ताईनगर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील उमेदवार होते. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर सत्तेचा दुरुपयोग झाल्याची चर्चा होती.आता या संदर्भात श्रीमती खडसे यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.

Rohini Khadse & Chandrakant Patil
Raj Thackrey Politics: विधानसभेच्या अपयशानंतर महापालिकेसाठी `मनसे`ची राज ठाकरेंवर भिस्त!

श्रीमती खडसे म्हणाल्या, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने त्यांना किती मते मिळणार, याविषयी समाज माध्यमांवर मतप्रदर्शन केले होते. निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच एखाद्या उमेदवाराला आपल्याला किती मते मिळणार, हे तो कसे समजू शकते. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे.

निकालाआधीच एक यादी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती. त्यात प्रतिस्पर्धी उमेदवाराने मला अमुक अमुक मते मिळतील, अशी गॅरंटी व्यक्त केली होती. या यादीतील आकडे आणि निकाल लागल्यानंतर विशिष्ट मतदान केंद्रांवर झालेले मतदान तंतोतंत कसे जुळले? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसभा निवडणुकीत यंदा धक्कादायक निकाल लागला सत्ताधारी महायुतीच्या २३० जागा निवडून आल्या. त्यांच्या विरोधात मोठी अपेक्षा असताना आणि जनतेत सत्ताधाऱ्यांविषयी नकारात्मक वातावरण असताना महाविकास आघाडीला अतिशय कमी जागा मिळाल्या. त्यामुळे राज्यभर आणि देशभर त्या निकालाचे पडसाद उमटत आहेत.

पुणे येथे झालेल्या सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आंदोलनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा व्यक्त केला होता. आता महाविकास आघाडी ईव्हीएम यंत्राबाबात मोठे आंदोलन उभारण्याच्या तयारीला लागली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आणि निवडणूक आयोग दोघांचीही विश्वासार्हता पुन्हा एकदा पणाला लागण्याची चिन्हे आहेत.

अशातच मुक्ताईनगर मतदारसंघातील उमेदवार रोहिणी खडसे यांनी केलेला धक्कादायक दावा अनेक प्रश्न निर्माण करतो त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com