Ramesh Kadam In Mohol : माजी आमदार रमेश कदमांसाठी मनसेच्याही स्वागत पायघड्या; मोहोळ मतदारसंघात उद्या ८ वर्षांनंतर येणार...

Solapur news : रमेश कदम यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी १४ सदस्यीय नियोजन समिती बनविण्यात आली आहे.
Ramesh Kadam mns Banner
Ramesh Kadam mns BannerSarkarnama
Published on
Updated on

Mohol News : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम हे उद्या (रविवार, ता. २४ सप्टेंबर) दुपारी मोहोळ विधानसभा मतदारसंघात येणार आहेत. तब्बल आठ वर्षांनंतर माजी आमदार कदम हे मतदारसंघात येत असल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मोहोळ शहर आणि तालुक्यात मिळून अडीचशेपेक्षा जास्त डिजिटल बोर्ड त्यांच्या स्वागतासाठी मतदारसंघात लागले आहेत. विशेष म्हणजे मनसेकडून त्यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. (Former MLA Ramesh Kadam will come to Mohol on Sunday after 8 years)

रमेश कदम यांची ठाण्यातील मध्यवर्ती कारागृहातून २० ऑगस्ट रोजी सुटका झाली होती. ते आठ वर्षांनंतर कारागृहातून बाहेर आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. त्याचवेळी त्यांनी आपण २४ सप्टेंबर रोजी मोहोळ विधानसभा मतदारसंघात जाऊन मतदारांशी चर्चा करूनच राजकीय निर्णय घेणार आहे, असे सांगितले होते. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही आपण भेटणार असल्याचे कदम यांनी जेलमधून सुटका होताच सांगितले होते. त्यानुसार कदम हे उद्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात येत आहेत.

Ramesh Kadam mns Banner
Modi To DeveGowda : नरेंद्र मोदींनी देवेगौडांची इच्छा पूर्ण केली अन्‌ कुमारस्वामींनी भाजपसोबत हातमिळवणी केली

संपूर्ण मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत आणि मोहोळ शहरात मिळून सुमारे अडीचशे स्वागताचे डिजिटल फलक लागले आहेत. त्यात मनसेही मागे राहिलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जय महाराष्ट्र प्रतिष्ठाननेही रमेश कदम यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावर मोडनिंबपासूनच कदम यांच्या स्वागताची सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर गावोगावच्या फाट्यांवर फलक लावून संबंधित ग्रामस्थ स्वागतासाठी थांबणार आहेत.

Ramesh Kadam mns Banner
Malegaon Sugar Factory : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’चे अध्यक्ष तावरेंऐवजी केशवराव जगताप झाले...

दरम्यान, माजी आमदार कदम यांच्या एन्ट्रीने मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बिघडणार आहेत, अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. आमदार कदम यांनी कारागृहात असताना २०१९ ची विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्या निवडणुकीत कुठलाही प्रचार न करता त्यांना २५ हजार मते मिळाली होती. त्यामुळे सर्वसामान्य मतदारांचे ते आभार मानणार आहेत. कदम यांच्या एन्ट्रीमुळे तालुक्यातील युवा वर्गात विशेषतः उत्साह दिसून येत आहे.

Ramesh Kadam mns Banner
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी वडेट्टीवारांचे नार्वेकरांना पत्र; ‘लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी...’

मोहोळ शहरात आगमन होताच रमेश कदम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ग्रामदैवत नागनाथ महाराज यांच्यासह शहरातील सर्वधर्मीय देव-देवतांचे ते दर्शन घेणार आहेत. माजी आमदार कदम यांच्या नागरी सत्कार सोहळ्यासाठी १४ सदस्यीय नियोजन समिती बनविण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे, असे रमेश कदम यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

Ramesh Kadam mns Banner
Nilesh Lanke Vs Vikhe Patil : आमदार नीलेश लंके भंडाऱ्यात न्हाले अन्‌ कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना टोमणे मारले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com