Nilesh Lanke Vs Vikhe Patil : आमदार नीलेश लंके भंडाऱ्यात न्हाले अन्‌ कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना टोमणे मारले

Dhangar Reservation Movement : खंडोबारायांचा प्रसाद भंडारा अंगावर पडला म्हणून मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धनगर समाज त्यांची जागा दाखवेल, असे विखे यांचे नाव न घेता सुनावले.
Nilesh Lanke Procession
Nilesh Lanke ProcessionSarkarnama

Nagar News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आल्यानंतर सरकारमध्ये महायुतीत सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके आणि भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय युद्ध थांबेल, असे वाटत असताना ते अधिकच वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. लंके यांच्या विधानसभा मतदारसंघातील ढवळपुरी या धनगर बहुल जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदारांच्या हस्ते झाले. यानिमित्त स्थानिक नागरिकांनी पारंपरिक धनगरी ढोल वाजवत आमदार लंकेंना खांद्यावर घेत त्यांना अक्षरशः भंडाऱ्याने अंघोळ घालत स्वागत केले. (Radhakrishna Vikhe Patil taunted by MLA Nilesh Lanke's activists)

अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश व्हावा, यासाठी समाजाकडून राज्यभर तीव्र आंदोलन सुरू आहे. चौंडीमध्ये गेल्या १८ दिवसांपासून यशवंत सेनेचे कार्यकर्ते बेमुदत उपोषण करत आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर सोलापूरमध्ये शेखर बंगाळे यांनी भंडारा टाकल्याने त्याला भाजपचे भाजपचे शहराध्यक्ष आणि सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ चर्चेत आला होता. त्यामुळे विखे पाटील यांच्याबद्दल धनगर समाजात नाराजीची भावना आहे.

Nilesh Lanke Procession
Modi To DeveGowda : नरेंद्र मोदींनी देवेगौडांची इच्छा पूर्ण केली अन्‌ कुमारस्वामींनी भाजपसोबत हातमिळवणी केली

तोच धागा पकडत आमदार नीलेश लंके यांच्यावर कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची तुफानी उधळण करत त्यांना खांद्यावर घेत ढवळपुरीत मिरवणूक काढली. या वेळी ढवळपुरीचे सरपंच भागा गावडे, सुखदेव चितळकर यांनी ‘एकीकडे भंडारा अंगावर टाकल्यामुळे लाथा बुक्क्यांनी मारहाण करणारे कुठं आणि एकीकडे भंडारा अंगावर उधळून आनंदाने खांद्यावर घेऊन नाचणारे कुठं. यालाच म्हणतात माणुसकी,' असे आमदार लंकेंचे कौतुक केले. खंडोबारायांचा प्रसाद भंडारा अंगावर पडला म्हणून मारहाण करणाऱ्यांना निवडणुकीत धनगर समाज त्यांची जागा दाखवेल, असे विखे यांचे नाव न घेता सुनावले. अशाच आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केल्या जात आहेत. कार्यक्रमस्थळीही या वेळी अशीच भावना व्यक्त झाल्या.

चौंडी येथे बेमुदत उपोषण सुरू असले तरी पालकमंत्री या नात्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अद्याप आंदोलकांची भेट घेतलेली नाही. त्यांचा मध्यंतरी ठरलेला चौंडी दौरा हेलिकॉप्टरच्या तांत्रिक कारणाने रद्द झाल्याचे सांगण्यात आले. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनीही चौंडीत माध्यमांशी बोलताना विखे पाटील यांनी भेट दिलेली असावी, असे मला वाटले. पण, ते अद्याप का आले नाहीत, याची माहिती नसल्याचे सांगत अधिक बोलणे टाळले होते.

Nilesh Lanke Procession
MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी वडेट्टीवारांचे नार्वेकरांना पत्र; ‘लोकशाहीवरील विश्वास दृढ करण्यासाठी...’

एकंदरीत धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना विखे पाटील यांच्यावरील नाराजी आमदार लंके यांची भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढत व्यक्त झाल्याचे पुढे येत आहे. यामुळे विखे-लंके राजकीय वाद वाढणार का? आणि यावर विखे पिता-पुत्रांकडून काय प्रतिक्रिया येते, याची उत्सुकता आहे.

Nilesh Lanke Procession
Malegaon Sugar Factory : अजितदादांनी शब्द खरा केला; ‘माळेगाव’चे अध्यक्ष तावरेंऐवजी केशवराव जगताप झाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com