Pahalgam Terror attack: शहीद लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या पत्नीला शिवसेना शिंदे पक्षाने देऊ केली नोकरी!

Eknath Shinde; Eknath Shinde Shiv Sena's Neeraj Sethi offers job to lieutenant Narwal wife -शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या हरियाणा प्रदेश शाखेच्या नीरज सेठी यांनी नरवाल कुटुंबीयांचे सांत्वन केले.
Eknath shinde & Neeraj Sethi
Eknath shinde & Neeraj SethiSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. दहशतवादी हल्ल्यातील प्रत्येक निधन झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानेही पुढाकार घेतला आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या हरियाणा शाखेचे प्रदेशाध्यक्ष नीरज सेठी यांनी नरवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली. पक्षाचे विविध पदाधिकारी ही त्यांच्यासोबत होते. नरवल कुटुंबीयांची त्यांनी यावेळी चर्चा केली आणि मदतीचे आश्वासन दिले. नरवाल यांच्या पत्नी यांना नोकरी देण्याची तयारी त्यांनी दाखवली.

Eknath shinde & Neeraj Sethi
Ajit Pawar CM : मोठी बातमी, पवार कुटुंब एकत्र येतंय! अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, यावर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया

यासंदर्भात मृत पर्यटकांना संबंधित राज्याच्या सरकारांनी विविध प्रकारच्या मदतीची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने देखील राज्यातील मृत पर्यटकांना मदतीती घोषणा केली आहे. या संदर्भात विविध सामाजिक संघटनांनी ही पुढाकार घेतल्या आहे.

Eknath shinde & Neeraj Sethi
Satish Patil & Anil Patil : 20 वर्षे कडाकडा भांडणाऱ्या दोन पाटलांनी घेतलं जुळवून... समीकरण नेमकं कसं बदललं?

लेफ्टनंट विनय नरवाल यांचा नुकताच विवाह झाला. नवविवाहित दांपत्य काश्मीर सहलीला गेले होते. यावेळी पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात लेफ्टनंट नरवाल यांचा मृत्यू झाला होता. नरवाल यांसह दहशतवादी हल्ल्यातील सर्व मृत्यू पर्यटकांबाबत देशभर हळहळ व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने घेतलेला पुढाकार चर्चेचा विषय ठरला आहे. प्रदेशाध्यक्ष सेठी आणि राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसूळ यांनी नरवाल यांच्या गावी कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले. नरवाल कुटूंबियांशी त्यांच्या गावी जाऊन चर्चा केली.

लेफ्टनंट विनय नरवाल यांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला यामुळे देशाची मोठी हानी झाली आहे. अशा संकटग्रस्त काळात शिवसेना नेहमीच पुढाकार घेऊन मदतीला जाते. त्यामुळेच आम्ही नरवाल कुटुंबीयांच्या सोबत उभे आहोत. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याची आमची तयारी आहे. यानंतरही आम्ही त्यांच्या संपर्कात राहू, असे नीरज सेठी यांनी सांगितले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com