Ajit Pawar CM : मोठी बातमी, पवार कुटुंब एकत्र येतंय! अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं, यावर रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया

MLA Rohit Pawar supports Ajit Pawar for Maharashtra CM post during a public interaction in Ahilyanagar NCP developments : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं, यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Ajit Pawar CM
Ajit Pawar CMSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी, मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही, अशी खंत पुन्हा एकदा बोलून दाखवली होती. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025’ च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

अजितदादांच्या या विधानानंतर महायुतीत चिंतेचे ढग दाटून आले होते. अजितदादांनी पुढं या विधानावरून गंमतीनं म्हटल्याचा खुलासा केला. पण आता अजितदांदाचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार रोहित पवार काल अहिल्यानगर शहर दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजितदादांनी (Ajit Pawar) मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा इच्छा व्यक्त केली. याकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, "दादा अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले आहेत, आता मुख्यमंत्री होणे बाकी आहे. होत असतील, तर स्वागतच आहे".

Ajit Pawar CM
Mahayuti government cabinet meeting : वेड्याबाभळीनं वेढलेल्या चौंडीचं 31 वर्षांत रुपचं बदललं; दीड हजार मतदानाचं गाव आता हायटेक झालं

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "राज्यात 288 आमदार आहेत. काही लोकं म्हणतील सत्तेत जावं. आमदारांची इच्छा आहे की, मंत्री व्हावं. मंत्र्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं. स्वाभाविक आहे की, अनेक वर्षे मंत्री राहिलेल्यांना मुख्यमंत्री व्हावं, असं वाटतं. या नेत्यांची त्यांची वैयक्तिक इच्छा आहे. दादाचं कार्य, काम, अनेक पदांवर आहे. अनेकदा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. मोठ्या पदावर जायचं असेल, तर एकच पद राहतं, ते म्हणजे मुख्यमंत्रीपद".

Ajit Pawar CM
Amol Khatal sand vehicle : एकनाथरावांचा शिलेदार रात्रीच्यावेळी पळाला वाळू चोरांच्या मागे; 'रिअल अ‍ॅक्शन' कारवाईचा दिला शब्द

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावेच...

'दादा देखील इच्छा व्यक्त करतात, त्यांचे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करतात, माझ्यासारखा त्यांचा पुतण्यासुद्धा, व्यक्तिगत विचारलं, तर आज त्यांची सत्ता आहे, आमची सत्ता नाही. पण पुतण्या म्हणून विचारलं, तर मला देखील वाटतं दादांना त्याप्रकारची संधी, या तिन्ही पक्षांच्या सरकारमध्ये मिळत असेल, तर मी सुद्धा स्वागतच करेल. दादा अनेकवेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत, आता मुख्यमंत्री होणे बाकी आहे. होत असतील, तर स्वागतच आहे', असेही रोहित पवार यांनी म्हटले.

पवार कुटुंब एकत्र येण्याचे संकेत

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करत असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिवसेना आणि त्यापाठोपाठ शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटली. राज्यात महायुती सरकार आहे. राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरद पवार आणि अजितदादांमध्ये दुरावा वाढला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब जवळ येताना दिसत आहे. घरगुती कार्यक्रमांनिमित्ताने शरद पवार आणि अजितदादा अलीकडच्या काळात अनेकदा एकत्र आले आहेत. त्यातच रोहित पवार यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रि‍पदावरून केलेले विधान, पवार कुटुंब एकत्र येत असल्याचे दर्शवते आहे.

अजितदादांना राऊत यांनी ऑफर

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या विधानावर थेट ऑफर दिली. अजित पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं, त्यांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये दुरी वाढत असून शिंदेंना नैराश्य आलं आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावलेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com