Sakal Survey 2024 : मुंबई कोणाची? ठाकरेंची की, भाजपची? 'सकाळ'चा सर्व्हे काय सांगतो

Assembly Elections Sakal Survey 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईकरांना महाविकास आघाडीला कौल दिला. विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांचा मूड कसा असेल, याची पाहणी सकाळने केली आहे. मुंबई कोणाची? ठाकरेंची की, भाजपची?
Sakal Survey 2024
Sakal Survey 2024Sarkarnama

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बाजुने कल देणारे मुंबईकरांचा मूड विधानसभा निवडणुकीत कसा असेल, हे 'सकाळ'च्या पाहणीत समोर आला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातून ‘मविआ’ला सर्वाधिक 51 टक्के पसंती मिळाली. महायुतीला 29 टक्के पाठिंबा मिळालेला दिसतो. काँग्रेसला सर्वाधिक पसंती देत 25 टक्के लोकांनी पाठिंबा दिला. त्यानंतर भाजप 21 टक्के, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20 टक्के नागरिकांनी पसंती दाखविली आहे.

लोकसभा निवडणुकीत मुंबईने महाविकास आघाडीला साथ दिली. मुंबईतील सहापैकी दोन जागा महायुतीला मिळाल्या. मुंबईकरांनी शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा पाठिंबा दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. विधानसभा निवडणुका पुढील तीन महिन्यावर आल्या आहेत. या विधानसभेत देखील महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे पक्षाचे वर्चस्व असेल, असे चित्र असण्याची शक्यता आहे.

Sakal Survey 2024
Ajit Pawar : मोठी बातमी! अजित पवारांची नवी खेळी, विधानसभेला दादा बारामतीच्या रिंगणाबाहेर?

मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील 36 जागांपैकी भाजपला (BJP) सर्वाधिक 16 जागा मिळाल्या. त्याखालोखाल शिवसेना 13, काँग्रेस 05, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मुंबईवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वर्चस्व दिसले. निवडणुकांमुळे भाजप महायुतीने देखील लढतीची जोरदार तयारी केली आहे. यातून सर्वत्र अटीतटीच्या लढती होतील, अशी शक्यता आहे. मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांत युती आणि आघाडीचा उमेदवार ठरवण्यात कस लागणार आहे.

Sakal Survey 2024
Kailas Gorantyal and Vijay Wadettiwar : एकीकडे काँग्रेसचे गोरंट्याल संशयाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे वडेट्टीवार म्हणतात, 'आता पक्षातील..'

मुंबईतील विकास प्रकल्प महायुतीच्या प्रचारात प्रमुख मुद्दे असतील. मात्र तरीही पुनर्विकासाचे मुद्दे, पाण्याचा प्रश्न, वाहतूक कोंडी, कोळीवाडे, मराठी विरुद्ध गुजराती वाद, असे अनेक मुद्दे कळीचे ठरणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकला चलो रे, असा नारा दिला आहे. तो मुंबईत कोणाला नुकसानदायक ठरतो, याकडे देखील पाहावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com