Congress and Vidhan Parishad Election Result : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटल्यावरून रणकंदन सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षात संशयाचे वातावरण निर्माण झाले. आमदार कैलास गोरंट्याल यांनी सुरुवातीलाच काँग्रेसची मत फुटणार आहेत असे सांगून, ती कोण कोण आहेत, याची माहिती आमच्याकडे आहे, असे सांगून धमाल उडवून दिली होती.
परंतु आता त्यांच्यावर मत फुटल्याचा आरोप झाला आहे. अशावेळी काँग्रेस नेता विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार त्यांच्या मदतीला धावून येत त्यांच्या पक्षनिष्ठेची पावती दिली. याशिवाय पक्षातील कचरा साफ करण्याचे संकेत दिले.
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल(Kailas Gorantyal) यांचे विधान परिषद निवडणुकीत मतं फुटल्याचे वृत्त समोर येत आहेत. कैलास गोरंट्याल यांनी मतदानच्या दोन दिवसांपासून कोण-कोणाची मतं काँग्रेसमधून फुटणार यावर माध्यमांसमोर सांगत होते. मतदान झाल्यानंतर बाण योग्य जागेवर लागला, असे सांगून काँग्रेसमधून ज्यांची मतं फुटली आहेत, ते समोर आले आहेत, असे देखील म्हटले होते. विधान परिषदेत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचे समोर आले.
यात ज्यांच्यावर आरोप होते आहेत, त्यात कैलास गोरंट्याल यांचे देखील नाव आहे. कैलास गोरंट्याल यांनी क्राॅस वोटिंग केल्याचे वृत्तसमोर येत आहे. मात्र असे असताना काँग्रेस नेता तथा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यावर कैलास गोरंट्याल यांच्या मदतीला धावून आले आहेत. आमदार कैलास गोरंट्याल यांच्या क्रॉस वोटिंगच्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. आमदार गोरंट्याल पक्षनिष्ठ आहेत. त्यांच्याबाबतचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनता आमच्याबरोबर आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केली आहे. ती आमच्या लक्षात आली आहे. जनतेच्या देखील लक्षात आली आहे. पक्षातील बेईमानाला आम्हाला शोधून काढायचे होते. म्हणूनच काँग्रेसने विधानपरिषद निवडणूक लढवली. आता पक्षातील कचरा साफ होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर घरच्या भेदींना शोधण्यात आम्हाला अधिकच चांगले यश आले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना संपूर्ण अहवाल दिला गेला आहे. गद्दारांवर आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार यांनी अशी भूमिका घेतल्याने महाराष्ट्र काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.