Sambhaji Bhide : सर्वधर्म समभाव म्हणजे षंढपणा; तिरंगा मानलाच पाहिजे पण, लाल किल्ल्यावर भगवा फडकवा - संभाजी भिडे

Bhide Guruji Controversy : मी एका ठिकाणी बोललो त्यातील अर्धवट भाग काढून तो आंबा खा मुले होतील, असं म्हणून पसरवून दिलं. प्रत्यक्षात मला एका नागरिकाने त्याला आलेला अनुभव सांगितला होता. तो मी सांगत होतो. मात्र, त्या वक्तव्यावरुन माझ्यावर कोर्टात खटला सुरु आहे.
Sambhaji Bhide
Sambhaji Bhidesarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 05 News : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरूजी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे षंढपणा असून हा प्रकार म्हणजे ना धड स्त्री ना पुरुष म्हणजेच नपुंसकपणा असल्याचं म्हटलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सोमवारी नाशिक येथील एका कार्यक्रमात धारकऱ्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शिवाय यावेळी त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीवेळी स्वीकारलेला तिरंगा झेंडा मानलाच पाहिजे.

मात्र, भगवा ध्वज हा लाल किल्ल्यावर फडकविण्यासाठी काम करा असंही संभाजी भिडे आहे. ते म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीवेळी तिरंगा झेंडा स्वीकारला गेला. त्यामुळे आपल्याला तिरंगा मानलाच पाहिजे, संविधान मानलंच पाहिजे.

परंतू हजारो वर्षांपासून अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज हा लाल किल्ल्यावर फडकवण्याच्या निर्धाधारासह देव देश अन् धर्माच्या कार्यासाठी कटिबद्ध राहा. 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करू, यावेळी तिरंगा फडकवू पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करत राहू, असं आवाहन त्यांनी धारकऱ्यांना केलं.

Sambhaji Bhide
'तू करमाळ्यात ये तुला दाखवतो', 'काय बघायचं ते बघ...'; शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ! शिंदेंचे शिलेदार हमरीतुमरीवर उतरले

दरम्यान, यावेळी त्यांनी आंबा खाऊन मुलं होतात या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, मी एका ठिकाणी बोललो त्यातील अर्धवट भाग काढून तो आंबा खा मुले होतील, असं म्हणून पसरवून दिलं. प्रत्यक्षात मला एका नागरिकाने त्याला आलेला अनुभव सांगितला होता. तो मी सांगत होतो. मात्र, त्या वक्तव्यावरुन माझ्यावर कोर्टात खटला सुरु आहे.

Sambhaji Bhide
Mahadevi Elephant: कोल्हापुरकरांसमोर 'वनतारा' झुकणार? थेट CM फडणवीसांनी लक्ष घातलं, आता महादेवी परतणार?

पण ज्याला माझ्या वक्तव्याची खात्री करायची आहे त्यांनी त्या माणसाला भेटावं तो आजही अस्तित्वात आहे. आणि ज्याला कुणाला आंबा खायचा असेल त्याने तिथे जाऊन आंब्याची चव चाखावी असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करणाऱ्यांवर तोंडसुख घेतलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com