'तू करमाळ्यात ये तुला दाखवतो', 'काय बघायचं ते बघ...'; शिवसेनेच्या बैठकीत गोंधळ! शिंदेंचे शिलेदार हमरीतुमरीवर उतरले

Shivsena leaders clash during Pandharpur meeting : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. अशातच पंढरपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत दोन नेते हमरीतुमरीपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे.
Eknath Shinde Shivsena Mahesh Chivte and Digvijay Bagal
Eknath Shinde Shivsena Mahesh Chivte and Digvijay Bagalsarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शिवसेनेच्या पंढरपूर येथील बैठकीत दिग्विजय बागल आणि महेश चिवटे यांच्यात जोरदार वाद झाला.

  2. पक्षनिरीक्षकांसमोरच एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरल्याने बैठकीचं रूपांतर गोंधळात झालं.

  3. या वादामुळे करमाळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Solapur News : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून मोर्चे बांधणीला वेग आला आहे. पक्ष पातळीवर बैठका आणि मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. पंढरपूर येथीही अशाच एका बैठकीचं आयोजन करण्यात आले होते. यासाठी पक्षनिरीक्षक गेले होते. पण त्यांच्यासमोरच करमाळा विधानसभा निवडणूक लढवलेले दिग्विजय बागल व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे भिडले. त्यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली असून दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा वापरली. यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. यावेळी करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मकाईचे संचालक आशिष गायकवाड, सतिश नीळ, कुलदीप पाटील, रंगनाथ शिंदे यांच्यासह दिग्विजय बागल व महेश चिवटे यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. (Shiv Sena leaders Digvijay Bagal and Mahesh Chivte clash during Pandharpur meeting ahead of local body elections in Maharashtra)

पंढरपूर येथे आयोजित बैठकीच्या वेळी दिग्विजय बागल यांनी आपण शिवसेना वाढीसाठी तालुकाभर काम करत आहोत. शिवसेनेच्या शाखा उघडण्यासाठी पुढाकार घेत आहोत. पण जिल्हाप्रमुख आपल्याला विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार केली. थेट पक्षनिरीक्षकांकडेच तक्रार झाल्याने जिल्हाप्रमुख महेश चिवटे भडकले.

Eknath Shinde Shivsena Mahesh Chivte and Digvijay Bagal
Solapur Shivsena : सोलापुरात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शहर समन्वयक, उपजिल्हाप्रमुखांसह 11 पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

तसेच त्यांनी बागल यांना सुनावत, तुझी बहीण भाजपमध्ये, तू शिवसेनेत... दोघेही बहीण भाऊ एकाच गाडीत मुंबईला जाता, त्या भाजप कार्यालयाकडे आणि तू शिवसेनेकडे जातो. तुम्ही बागलांनी तालुक्यातील दोन्हीही साखर कारखाने (आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सह. साखर कारखाना) लुटून खाल्ले असा आरोप केला. यामुळे बैठकीतील वातावरण चांगलेच तापले होते.

चिवटे यांनी बागल यांच्यावर केलेल्या आरोपानंतर बागलही भडकले आणि त्यांच्यात हमरीतुमरी झाली. यावेळी तुझ्याकडे बघतोच अशी भाषा बागल यांनी वापरली. तर काय बघायचे ते आत्ताच बघून घे असे प्रतिआव्हान चिवटे यांनी दिले. तसेच तू बाहेर ये, तू करमाळ्यात ये तुला दाखवतो असेही बागल यांनी चिवटे यांना धमकावले.

ज्यावर संतापलेल्या चिवटे यांनी, काय बघायचे ते बघ. करमाळ्यातच काय तर तुझ्या मांगीत मी येतो. तू काय करतोस तेच बघतो, असे उलट उत्तर दिल्याने बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते काही शांत झाले नाहीत.

माजी आमदार शामलताई बागल यांचे चिरंजीव मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी शिवसेना पक्षाकडून करमाळा विधानसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा पासून ते शिवसेनेत सक्रिय झाले आहेत. विधानसभा निवडणूक दिग्विजय बागल यांच्या प्रचारासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे शिवसेनेकडून सक्रिय होते.

मात्र विधानसभा निवडणुकीनंतर महेश चिवटे आणि दिग्विजय बागल यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत. ते आज पंढरपूर येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षनिरीक्षकांच्या समोरच उफाळून आले. याची आता जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू असून या प्रकरणाकडे पक्षश्रेष्ठी कसे पाहतात हेच पाहावं लागणार आहे.

Eknath Shinde Shivsena Mahesh Chivte and Digvijay Bagal
Shivsena Politics : "शिंदेंच्या त्रासाला कंटाळून म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते, पण ठाकरेंच्या आदेशामुळे..."; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा खळबळजनक दावा

FAQs :

1. पंढरपूरच्या बैठकीत काय घडलं?
दिग्विजय बागल आणि जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यात तीव्र वाद झाला, आणि एकमेकांना धमक्या दिल्या गेल्या.

2. कोणाच्या उपस्थितीत हा वाद झाला?
हा वाद थेट पक्षनिरीक्षकांच्या समोर झाला, जे स्थानिक निवडणूक तयारीसाठी आले होते.

3. या वादाचा राजकीय परिणाम काय होऊ शकतो?
या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत तणाव उघड झाला असून, स्थानिक निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com