Ahmednagar News: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून सत्ताधाऱ्यांना आरक्षण समर्थकांच्या रोषाचा सामना सध्या करावा लागत आहे. तर आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आम्ही सोडला नसल्याची आठवण संभाजी ब्रिगेडने करून दिली आहे.
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आम्ही मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडला नसल्याची राज्य सरकारला आठवण करून दिली.
"एक जून 2001 च्या शासननिर्णयानुसार मराठा समाजातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळतू शकते, असे सांगून 102 व्या घटना दुरुस्तीने खुल्या वर्गातील 10 टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या सवलतीचा लाभ मिळू शकतो", असे प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.
"राज्य घटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची प्रेरणा शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर हे महापुरुष आहेत. हे सर्व महापुरूष महाराष्ट्रात होऊन गेले आहेत. आपल्याकडे एवढी प्रेरणा असताना मराठी माणसाचा कणा का मोडलेला आहे ? असा प्रश्न करत मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येच्या मार्गाला न जाता पर्यायाचा विचार करावा", असे आवाहन गायकवाड यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थित नगर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, नगर दक्षिण कार्याध्यक्ष सुनील ढवळे, संघटक गणेश पारे, सचिव हेमंत हिरडे, कर्जत तालुकाध्यक्ष नवनाथ धनवे, पारनेर तालुकाध्यक्ष तुषा मोरे, श्रीगोंदे शहराध्यक्ष विजय वाघमारे यांची निवड करण्यात आली. प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे, प्रदेश संघटक अजयसिंह सावंत, प्रदीप कणसे, सचिन देसाई उपस्थित होते.
Edited by Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.