Mahayuti Politics: वरिष्ठ नेते अपक्षांच्या संपर्कात? "या" पाच मतदारसंघात अपक्ष ठरणार किंग मेकर!

Independent candidates in key constituencies Maharashtra elections: नाशिक जिल्ह्यातील प्रतिष्ठित बंडखोरांनी अपक्ष उमेदवारी करीत पाच मतदारसंघांमध्ये बदलले निवडणुकीचे गणित
Nirmala Gavit, Sameer Bhujbak, Dr Rohan Borse, Keda Aher, Bandu kaka Bachhav & Asif shaikh
Nirmala Gavit, Sameer Bhujbak, Dr Rohan Borse, Keda Aher, Bandu kaka Bachhav & Asif shaikhSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Election Exit Poll: नाशिक जिल्ह्यात काँग्रेस आणि अन्य पक्ष उमेदवारी देताना चुकले. त्याचा फटका या पक्षांच्या उमेदवारांना निवडणुकीत बसला. जिल्ह्यातील पाच मतदारसंघात हे अपक्षच किंगमेकर ठरणार आहेत.

नांदगाव मतदार संघात माजी खासदार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्यात पारंपारिक राजकीय वाद आहे. या वादातूनच निवडणुकीत कांदे यांचे गणित विस्कटण्यासाठी माजी खासदार भुजबळ यांनी अपक्ष उमेदवारी केली. सबंध निवडणुकीत हे दोन उमेदवार परस्परांशी भिडत होते. त्यात मराठा महासंघाचे डॉ रोहन बोरसे हे शांतपणे प्रचारात थेट मतदारांना भेटत होते. माजी खासदार भुजबळ आणि डॉ बोरसे हे नांदगावचा आमदार कोण? हे ठरवणार आहेत. या दोघांनीही किंगमेकर या दृष्टीनेच डावपेच आपले होते.

Nirmala Gavit, Sameer Bhujbak, Dr Rohan Borse, Keda Aher, Bandu kaka Bachhav & Asif shaikh
Sameer Bhujbal Politics: सुहास कांदे यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, पोलीस दबावाखाली!

इगतपुरी मतदार संघात काँग्रेसच्या धडसोड वृत्तीने त्यांचा एक आमदार कमी झाला आहे. आमदार हिरामण खोसकर यांच्यावर क्रॉस वोटिंग चा आरोप होता. त्यांना उमेदवारी द्यायची की नाही, हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला गेला. वरिष्ठ नेत्यांतील वादात खोसकर अजित पवार यांच्या पक्षासोबत निघून गेले. त्यानंतर प्रबळ उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उपनेते माजी आमदार निर्मला गावित यांना उमेदवारी देण्यासाठी सर्व स्थानिक नेत्यांनी एकजूट केली.

मात्र येथेही नेत्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करीत त्यांना उमेदवारी दिली नाही. माजी आमदार गावी या आता अपक्ष आमदार म्हणून मतदारसंघात जोरदार आव्हान उभे करण्यात यशस्वी झाल्या. इगतपुरीचा आमदार कोण? हे माजी आमदार गावित याच ठरवतील असे चित्र आहे.

Nirmala Gavit, Sameer Bhujbak, Dr Rohan Borse, Keda Aher, Bandu kaka Bachhav & Asif shaikh
Assembly election: धक्कादायक; या मतदान केंद्रावर रात्रीही सुरू राहते मतदान, "हे" आहे कारण!

चांदवड मतदार संघात भाजपचे नेते आणि `नाफेड`चे संचालक केदा आहेर हे उमेदवारीचे दावेदार होते. मात्र पक्षाने विद्यमान आमदार डॉ राहुल आहेर यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे केदा आहेर यांनी बंडखोरी केली. केदा आहेर यांना भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एक एक गट मिळाला. त्यामुळे चांदवड देवळा मतदार संघाचा प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते किती मते घेतात यावर मतदार संघाचा निकाल ठरेल.

मालेगाव मध्य मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माजी आमदार असिफ शेख यांनी नियोजनपूर्वक निवडणुकीची तयारी केली होती. त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन स्थानिक समीकरण विचारात घेता अपक्ष उमेदवारी केली. आता ते विजयाचा दावा देखील करतात. एक प्रबळ उमेदवार म्हणून ते मतदार संघाचे गणित बिघडवणार आहेत. ते निवडून येण्याची देखील शक्यता असल्याने राजकीय पक्ष त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते.

मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे यांना एकेकाचे त्यांचे कनिष्ठ मित्र आणि निवडणुकीचे सर्व सूत्रे हाताळणारे बंडू काका बच्छाव यांनी अपक्ष उमेदवारी करीत मोठे आव्हान दिले आहे. बच्छाव हे प्रामुख्याने भुसे यांच्या मतांमध्ये वाटेकरी होणार आहेत. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अद्वय हिरे यांना त्याचा लाभ होऊ शकतो. बंडूकाका बच्छाव हे देखील निवडून येण्याची शक्यता असलेल्या उमेदवारांमध्ये समाविष्ट होतात.

जिल्ह्यात पाच मतदारसंघांमध्ये सहा प्रबळ अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली होती. त्यांच्यासाठी कार्यरत यंत्रणा आणि कार्यकर्ते विचारात घेता पाच मतदारसंघांमध्ये हे उमेदवार राजकीय पक्षांचे गणित बिघडवणार आहेत. त्यामुळे या पाच अपक्षांवर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com