Nashik Election: पक्षाच्या उमेदवारांपेक्षा बंडखोरांच्याच भक्कम दावेदारीने नाशिकची निवडणूक चर्चेत

Rebels Challenge Party Candidates Nashik: चार मतदारसंघात उमेदवारांपेक्षाही बंडखोरांचाच बोलबाला. शक्तीप्रदर्शन मतदारांना आकर्षीत करीत आहे-
Sameer Bhujbal, Nirmala Gavit, Keda Aher & Bandu Kaka Bachhav
Sameer Bhujbal, Nirmala Gavit, Keda Aher & Bandu Kaka BachhavSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly election 2024 : नाशिक जिल्ह्यातील चार मतदारसंघांत झालेली बंडखोरी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत आहे. उमेदवारांपेक्षा बंडखोरच प्रबळ असल्याने ते आपल्या प्रभावाने भाजप आणि काँग्रेस उमेदवार अक्षरशः झाकोळले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील बंडखोरी झोपविण्यात महायुती आणि महाविकास आघाडी पूर्णतः यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे अधिकृत उमेदवारांपेक्षाही प्रबळ उमेदवार अशी प्रतिमा असलेले बंडखोर मैदानात आहेत. त्यांचा धोका भाजप आणि शिवसेना शिंदे गटावर वरच काँग्रेसच्या उमेदवारांनाही आहे.

या बंडखोरांवर उपाय शोधावा लागेल. अधिकृत उमेदवारांना राजकीय तोडगा काढावा लागणार आहे. सध्या तरी अधिकृत उमेदवारांच्या क्षमतेबाहेरचे हे गणित बंडखोरांनी निर्माण केले आहे, असे चित्र आहे.

भारतीय जनता पक्षाचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरी थोपविण्यासाठी नाशिकचा विशेष दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भाजपच्या बंडखोर आणि नाराज पदाधिकाऱ्यांची व्यक्तिशः चर्चा केली. त्यामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघातील माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतली.

Sameer Bhujbal, Nirmala Gavit, Keda Aher & Bandu Kaka Bachhav
Girish Mahajan: `संकट मोचक` गिरीश महाजन यांच्या जळगावतच भाजप पुढे बंडखोरीचे संकट!

नाशिक पश्चिम मतदारसंघात पक्षाचे भाजपचे विविध माजी नगरसेवक नाराज आहेत. माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भाजपचा राजीनामा देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी केली आहे. त्यामुळे भाजपच्या मतांमध्ये विभागणी अटळ आहे.

त्या तुलनेत महाविकास आघाडीला कामगार नेते डॉ डी. एल. कराड या प्रमुख नेत्याची माघार घेण्यात यश आले. त्यांचा औद्योगिक वसाहतीत प्रभाव असल्याने त्याचा फायदा शिवसेनेला होईल. डॉ. कराड यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली.

इगतपुरी मतदार संघात काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष आणि अन्य नेत्यांतील वैचारिक दुराव्यामुळे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना गमावले. आमदार खोसकर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून उमेदवारी करीत आहेत. पक्षाने येथे लकी जाधव या नवख्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली.

Sameer Bhujbal, Nirmala Gavit, Keda Aher & Bandu Kaka Bachhav
Girish Mahajan: `संकट मोचक` गिरीश महाजन यांच्या जळगावतच भाजप पुढे बंडखोरीचे संकट!

श्री. जाधव यांना उमेदवारी दिल्याने केवळ काँग्रेसच नव्हे तर सबंध महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी असहकार पुकारला आहे. आता या नेत्यांनी माजी आमदार निर्मला गावित यांची अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. हे सर्व पदाधिकारी माजी आमदार गावित यांच्या प्रचारात व्यस्त आहेत.त्याचा मोठा फटका काँग्रेस पक्षाला बसेल, असे सध्याचे चित्र आहे.

चांदवड मतदार संघ आणि तेथील बंडखोरी यंदा विशेष चर्चेचा विषय बनली आहे. या ठिकाणी काँग्रेसने गेले दोन वेळा पराभूत झालेल्या व जिल्हाध्यक्ष असलेल्या शिरीष कोतवाल यांना उमेदवारी दिली आहे. कोतवाल यांच्या उमेदवारीला पक्षातील इच्छुकांचा विरोध होता.

बाजार समितीचे सभापती, काँग्रेसचे संजय जाधव यांनी उमेदवारी मागे घेतली. मात्र भाजप बंडखोर केदा आहेर यांच्या कंपूत ते सामील झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार भालेराव यांनीही कोतवाल यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून भाजप बंडखोर केदा आहेर यांना पाठिंबा दिला आहे.

भाजपचे दुसरे बंडखोर डॉ आत्माराम कुंभार्डे यांनीही हाच कित्ता गिरवला आहे. केदा आहेर यांनी बंधू व भाजपचे उमेदवार आमदार डॉ राहुल आहेर यांच्या उमेदवारीला विरोध म्हणून बंडखोरी केली आहे. त्यामुळे सध्या तरी चांदवड- देवळा मतदार संघात बंडखोरांचा बोलबाला आहे.

नांदगाव मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना माजी खासदार समीर भुजबळ यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे. समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली आहे.

मालेगाव बाह्य मतदार संघात मंत्री दादा भुसे यांनाही त्यांचेच जुने सहकारी बंडू काका बच्छाव यांनी आव्हान दिले आहे. बंडू काका बच्छाव हे शिवसेना ठाकरे पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र शिवसेना ठाकरे पक्षाकडून या मतदारसंघात उपनेते डॉ अद्वय हिरे यांना उमेदवारी दिली. जिल्ह्यातील चार प्रबळ बंडखोर अधिकृत उमेदवारांना प्रचारात दमछाक करायला लावतील, अशी सध्याची स्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com