Samruddhi Mahamarg Farmer's Andolan: सिन्नरच्या शेतकऱ्यांनी थेट समृद्धी महामार्गच रोखला!

Samruddhi Highway affected farmer`s agitaion at Sinner- राज्य सरकार आश्वासनांची पूर्तता करत नसल्याने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केले आंदोलन
Samruddhi affected farmers at Sinner
Samruddhi affected farmers at SinnerSarkarnama
Published on
Updated on

Nashik Farmers News : समृद्धी महामार्गासाठी जमीनी घेताना राज्य शासनाने शेतकऱ्यांना तोंडभरून आस्वासने दिली. मात्र हा महामार्ग कार्यन्वीत होताच सरकारने शेतकऱ्यांची उपेक्षा केली. या प्रश्नावर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांनी आंदोलन करीत समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. (Farmers alligation on Highway contractor as well State Government)

सिन्नर (Sinner) तालुक्यातील समृद्धी महामार्गबाधीत (Samruddhi Highway) शेतकऱ्यांनी (Farmers) काल वावी येथे आंदोलन केले. यावेळी त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी (Police) त्यात हस्तक्षेप करीत आंदोलन थांबवले.

Samruddhi affected farmers at Sinner
Shivsena News : दुष्काळाच्या प्रश्नावर शिवसेनेने सुहास कांदेंना कोंडीत पकडले!

स्वातंत्र्य दिनाला काल समृद्धी महामार्गावर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी शिर्डीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरील वाहतूक पंधरा मिनिटे अडवली. यावेळी पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

तहसीलदार सुरेंद्र देशमुख, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन लोखंडे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहअभियंता निंबादास बोरसे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन थांबविण्याची विनंती केली.

Samruddhi affected farmers at Sinner
Supriya Sule News : साहेब-दादांच्या भेटीत मी नव्हते ; राजकीय विचार वेगळे मात्र, कुटुंब एकच..

येत्या २८ ऑगस्टला सिन्नर तहसीलदार कार्यालयात समृद्धी महामार्गबाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. त्यात या विषयांवर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

सरकारने समृद्धी बाधितांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी, समृद्धी महामार्गालगतच्या शेतकऱ्यांचे पावसाळ्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, प्रकल्पाच्या उभारणीदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये जीव गेलेल्या दहा स्थानिक तरुणांच्या वारसांना रस्ते विकास महामंडळामार्फत कायमस्वरूपी नोकरी द्यावी, सर्व्हीस रोडची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत. समृद्धी महामार्गासाठी वापरल्या गेलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी या मागण्या शेतकऱ्यांनी केल्या.

Samruddhi affected farmers at Sinner
Dada Bhuse News : आम्ही मुख्यमंत्र्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देत असतो!

यावेळी समृध्दी महामार्गाचे बांधकाम करणारे कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीला दातली ग्रामपंचायतीने २९ लाखांचा कर थकविल्याची नोटीस बजावली. सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, नितीन अत्रे, भास्कर कहांडळ, आप्पा शिंदे, भास्कर वारूंगसे, मधुकर वारुंगसे, जगदीश ढमाले, सुभाष शिंदे यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com