Balasaheb Thorat & Kokate politics : राज्यातील अनेक आमदार विरोधातून सत्ताधाऱ्यांच्या पक्तींत जाऊन बसत आहेत. त्यासाठी कारण देतात मतदारसंघाच्या विकासाचे. मात्र सिन्नरमध्ये समृद्धी महामार्गामुळे विस्थापीत झालेल्या शेतकऱ्यांकडे राज्य सरकारचं साफ दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील हे शेतकरी चक्क काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रश्नांचा पाठपुरावा करीत असल्याचे चित्र आहे. (State Government ignoring Sinner`s farmers issues after continues followup)
सिन्नर (Sinner) मतदारसंघातील शेतकऱ्यांनी (Farmers) स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी समृद्धी महामार्गावर आंदोलन केले. आपल्या प्रश्नांकडे राज्य शासन (Maharashtra Government) दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत ते काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत.
सिन्नर मतदारसंघातील या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. याबाबत त्यांनी काँग्रेस नेते थोरात यांच्याशी चर्चा करून समृद्धी महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. त्यावर माजी मंत्री थोरात यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला. दोन वेळा मंत्र्यांकडे विचारणा केली. त्याबाबत मंत्र्यांनी या शेतकऱ्यांकडे राज्य शासन सहानुभूतीपूर्ण दृष्टीने पाहते आहे, एव्हढेच उत्तर दिले. प्रश्न केव्हा सोडवणार याबाबत मात्र सरकारचे मौन आहे.
येथील शेतकऱ्यांनी पावसाळी अधिवेशन संपल्यावर वाट पाहिली. मात्र प्रशासनाने त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागले. मतदारसंघ राज्य सरकारचा घटक असलेले कोकाटे यांचा. सरकार प्रश्न सोडवणार, विकास करणार म्हणून आमदारांनी गट बदलला, मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेना. हा प्रश्न देखील काँग्रेसचे नेते थोरात यांनी मांडला. त्यामुळे आमदार सत्ताधारी गटात गेल्यावर देखील मतदारसंघाच्या नागरिकांचे प्रश्न सुटणार नसतील तर मग भविष्यात काय, अशी चिंता या आंदोलकांनी व्यक्त केली.
येत्या २८ ऑगस्टला सिन्नर तहसीलदार कार्यालयात समृद्धी महामार्गबाधित शेतकरी आणि रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल. त्यात या विषयांवर चर्चा करून तोडगा निघेल, असे आश्वासन तहसीलदार देशमुख यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे, नितीन अत्रे, भास्कर कहांडळ, आप्पा शिंदे, भास्कर वारूंगसे, मधुकर वारुंगसे, जगदीश ढमाले, सुभाष शिंदे यांसह असंख्य शेतकरी या प्रश्नावर आंदोलनात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.