`समृद्धी`च्या दर्जाहीन कामात कोणाकोणाचे खिशे गरम झाले

समृद्धी महामार्गाचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
Aditya Thackery
Aditya ThackerySarkarnama

नाशिक : मुंबई- नागपूर समृद्धी (Mumbai Nagpur Samruddhi Highway) महामार्गाच्या कामाचा गाजावाजा केला जात असली तरी त्यात अनेक त्रुटी (errors) असल्याचे पुढे येत आहे. हे काम दर्जाहीन (poor quality) असल्याचा आरोप करून त्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते, (Shivsena leader) माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackerey) यांनी केला आहे. (Aditya Thackery criticised samruddhi highway works)

Aditya Thackery
Aditya Thackrey: दिवाळीच्या रेशन किट पुरवठ्यात मोठा घोटाळा!

सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीबद्दल माहिती दिली. सरकारकडून नुकसानभरपाई पोटी मिळणारी मदत तोकडी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Aditya Thackery
शिंदे गटामुळे भाजपच्या निवडणूक तयारीत खोडा!

यावेळी श्री. ठाकरे म्हणाले, मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाचे काम दर्जाहीन झाले आहे. या कामात कोणाकोणाचे खिशे गरम झाले, ते नाव घेऊन सांगण्याची गरज नाही.

ते पुढे म्हणाले, ज्यांच्याकडे सुरवातीपासून समृद्धीचे काम होते तेच आता मुख्यमंत्री बनले. आमची चूक झाली. आम्ही त्यावेळी समृद्धीच्या कामाकडे लक्ष दिले नाही. ठेकेदार शेतकऱ्यांवर बंदूक रोखून अरेरावी करतो. या बंदुकांना परवाना आहे काय, हे पोलिसांनी तपासावे.

समृद्धीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्यांनी प्रकल्पासाठी जमिनी दिल्या, त्यांना त्यांच्या शेतांत जायला रस्ते नाहीत. समृद्धीलगतच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरले. त्याबाबत सरकारला देणेघेणे नाही, याकडे श्री ठाकरे यांनी लक्ष वेधले.

राज्यात सामान्य जनतेचा आवाज दडपण्याचे काम सरकारकडून होत आहे. जगाचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरून निघणार नाही. मात्र, सरकारकडून दिलासा देणारे शब्दही ऐकायला मिळत नाही, ही शोकांतिका असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. सरकारकडून केवळ मदतीची घोषणा झाली. शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले हे सर्वजण जाणून आहेत. शेतकऱ्याची समस्या जाणून घ्यायची असेल, तर प्रत्यक्ष बांधावर जाण्याची गरज आहे. मात्र, राज्याला लाभलेले कृषी मंत्री शेतकऱ्यांची अवहेलना करतात. मुख्यमंत्री नेमके कोण हेही समजत नाही. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुढे आली आहे. सध्यास्थितीत शेतकऱ्यांना धीर देण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकत नसल्याची खंत श्री. ठाकरे यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन आहीर, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांसह विविध नेते उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com