Radhakrishna Vikhe on Balasaheb Thorat : थोरातांची ठोकून काढण्याची भाषा, 'टेप' माझ्याकडे आलीय; मंत्री विखेंचा गौप्यस्फोट

Sangamner MLA Amol Khatal Attack Radhakrishna Vikhe Allegations on Balasaheb Thorat : संगमनेर इथं शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
Radhakrishna Vikhe 1
Radhakrishna Vikhe 1Sarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena MLA attacked Sangamner : संगमनेरमधील शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर काल हल्ल्याचा प्रयत्न झाला. याचे पडसाद आता संगमनेरमध्ये उमटू लागले आहेत. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमधील बाजारपेठ बंद ठेवत महायुतीने मोर्चा काढला आहे.

तत्पूर्वी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गौप्यस्फोट करणारी प्रतिक्रिया समोर आली आहे. "काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या लोकांना ठोकून काढा, अशी भाषा वापरणारी त्यांच्या कार्यकर्त्यांची, सरपंचाची टेप आपल्याकडे आहे," असा खळबळजनक गौप्यस्फोट मंत्री विखे पाटील यांनी केला आहे.

आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमध्ये (Sangamner) मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात संगमनेर, अकोले, राहाता, कोपरगावासह अहिल्यानगर जिल्ह्यातील महायुतीचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. या निषेध मोर्चात भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. लोणी इथून ते संगमनेरच्या दिशेने निघाले असून, त्यानंतर ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

लोणी इथून निघण्यापूर्वी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी बाळासाहेब थोरातांविषयी (Balasaheb Thorat) त्यांच्या कार्यकर्त्याने, सरपंचाने केलेल्या विधानावर खळबळजनक दावा केला. मंत्री विखे पाटील म्हणाले, "मी संगमनेरला चाललो आहे. तिथं प्रत्यक्षात जाऊन पाहतो, काय होतं ते! पण तिथल्या प्रकारानंतर धक्कादायक, अशा 'टेप' माझ्याकडे आलेल्या आहेत. त्यांचेच कार्यकर्ते, सरपंच असतात की आम्हाला, त्यांचे नेते बाळासाहेब थोरातांनी सांगितल की, भाजपच्या लोकांना जिथं असेल, तिथं ठोकून काढा."

Radhakrishna Vikhe 1
Governor powers on bills : विधेयके प्रलंबित ठेवली; राज्यघटनेच्या 'अनुछेच्द 200'ची तरतूद काय सांगते वाचाच!

"आमदार खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्यात पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या हल्लेखोराने हल्ला करण्यापूर्वी कोणाच्या संपर्कात होता, कोणाचे काॅल होते. काय मेसेज होते, याची सर्व चौकशी होईल. आता ही ठोकशाहीची भाषा, आता हे एवढे वैफल्यग्रस्त झाले आहे की, एवढं वैफल्यग्रस्त होणं बरोबर नाही. 40वर्षे तालुक्यातील जनतेच्या जीवावर सत्ता भोगली आहे. आता तुम्हाला जनतेने नाकारलं आहे. आता नवीन माणसाला संधी मिळाली आहे, हे त्यांनी मान्य केले पाहिजे, असेही मंत्री विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Radhakrishna Vikhe 1
Sane Guruji National Memorial: असं उभारलं साने गुरुजीचं राष्ट्रीय स्मारक; विद्यार्थ्यांनी पाच रुपयांची मदत...

आमदार खताळ यांच्यावर हल्ला कसा झाला?

शिवसेनेचे आमदार अमोल खताळ हे गुरूवारी (ता.28) संगमनेरला एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांच्याशी एका व्यक्तीने हल्ला चढवला. हात मिळवण्याच्या बहाण्यानं हा हल्ला केला. आमदार खताळ यांनी कानावर बुक्की मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. गुंजाळ नावाची ही व्यक्ती असल्याचे आमदार खताळ यांनी म्हटले आहे. संगमनेरमध्ये झालेले राजकीय परिवर्तन हे काहींना रुचलेले नाही. त्यातूनच हा माझ्यावर हल्ला झाल्याची प्रतिक्रियाही आमदार खताळ यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com