Sanjay Raut : भुजबळांवर अजित पवारांची नाही तर पीएम मोदींची कृपा, राजीनामा द्या..संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली असून संजय राऊत यांनी छगन भुजबळांना त्यावरुन डिवचलं आहे.
Sanjay Raut, Chhagan Bhujbal
Sanjay Raut, Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला तसेच सरकारच्या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडी सुरु असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत भुजबळांवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळांना राष्ट्रवादीने मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. भुजबळ ओबीसी नेते असल्याने स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विशेष लक्ष घालून देवेंद्र फडणवीसांना सांगून भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं. भुजबळ हे अजित पवारांच्या नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान असले तरी ते स्वत:ला ओबीसी नेते मानतात. मी ओबीसीचा सर्वात मोठा नेता आहे असं ते म्हणतात. भुजबळ ओबीसी असल्याने मोदींच्या सांगण्यावरुनच त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं. आता भुजबळच नाराज असल्याने ते पंतप्रधान मोदींशी चर्चा करतील असं मला वाटतं. कारण, त्यांनीच त्यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. आरक्षण पक्के होण्यासाठी घटनादुरुस्ती आवश्यक आहे. त्याला कायदेशीर प्रारुप देण्यासाठी ते करुन घेतील. भुजबळ जर खरच ओबीसी नेते असतील तर तर त्यांनी आपला राजीनामा देऊन आपली नाराजी दाखवली पाहीजे असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut, Chhagan Bhujbal
Shiv Sena : नाशिकमधील ती झोपडपट्टी वाचवण्यासाठी शिवसेना मैदानात, महापालिका आयुक्तांकडे धाव..

संजय राऊत पुढे म्हणाले, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा ते मंत्रिमंडळात आहेत हे महत्वाचे आहे. जर भुजबळांना त्यांच्या ओबीसी समाजावर अन्याय झाला असे वाटत असेल तर भुजबळ हे राजीनामा देणार का? ते खरोखर एखाद्या समाजाचे नेतृत्व करत असतील आणि त्या समाजावर अन्याय झाला आहे असे कुणाला मनापासून वाटत असेल तर त्याने त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. मग ते महाराष्ट्र असेल किंवा देशाचं मंत्रिमंडळ असेल.

ज्याप्रमाणे सी. डी देशमुख यांनी राजीनामा दिला. त्यांचे नेहरुंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर. तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे, ज्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात हा अन्याय झाला त्यांच्या हाताखाली तुम्ही काम करत आहात, हे तुम्ही मान्य करत आहात. त्यामुळे भुजबळांनी आपला राजीनामा सोपविला पाहीजे अन् मी या या कारणासाठी राजीनामा देतोय असं स्पष्ट केलं पाहीजे असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut, Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ म्हणतात, थोडं थांबा, अभ्यास करू द्या, त्यानंतर घेऊ भूमिका, मात्र आंदोलने नकोच!

मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलोय असं तुम्ही सांगतात. ओबीसीवर अन्याय झाल्याचे म्हणतात. कॅबिनेटवर बहिष्कार टाकताय याचा अर्थ तुम्हाला कॅबिनेटवर व मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही. मग तुम्ही स्वाभिमान व नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन समाजाचं नेतृत्व करा. तुम्ही मंडलच्या विषयावर शिवसेना सोडली होती. आता तुमच्या समजावर अन्याय होत असेल तर तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहीजे. मंत्रिमंडळ सोडणार का? असा सवाल संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com