Sanjay Raut : संजय राऊतांच्या आदेशाला केराची टोपली, जळगावात कोअर कमिटीच्या स्थापनेला ब्रेक

Sanjay Raut’s directives to form a Shiv Sena UBT core committee in Jalgaon were not followed by local workers : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तयारीला जळगावात सुरु होण्याआधीच ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तयारीला जळगावात सुरु होण्याआधीच ब्रेक लागल्याचे चित्र आहे. खासदार संजय राऊत हे 31 मे रोजी जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यांनी संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय कोअर कमिटी स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र दीड महिना उलटूनही ही कमिटी अद्याप स्थापन होऊ शकलेली नाही.

लोकसभेसह विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे जिल्ह्यातील महाविकास आघाडीला मरगळ आली होती. जिल्ह्यातील शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे दोन्ही गटाला गळती लागली. त्यादृीने कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी संजय राऊत यांनी खास जळगाव दौऱ्यावर जात निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. मात्र राऊत यांच्या आदेशाला पक्षात केराची टोपली दाखवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.

संजय राऊत यांनी आदेश देऊनही कमिटी स्थापन होण्यास विलंब झाला आहे. कमिटीत ज्या सदस्यांची नेमणूक केली जाईल ते सदस्य निवडणुकीपर्यंत पक्षासोबत राहतील की नाही याबाबतच आता साशंकता निर्माण झाली आहे. कारण या कमिटीमध्ये महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेते यांसारख्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश अपेक्षित होता. मात्र, पक्षातीलच महत्वाचे दोन नेते, माजी महापौर नितीन लढ्ढा आणि प्रदीप रायसोनी या दोघांनी कमिटीत येण्यास असमर्थता दर्शविल्याने ही प्रक्रिया थांबली आहे.

Sanjay Raut Latest News
Manikrao Kokate : अखेर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधानभवनात प्रकटले; आल्याच्या दिवशीच सत्ताधारी, विरोधक तुटून पडले !

त्यामुळे आता जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे आणि माजी महापौर जयश्री महाजन या तिघांवरच 19 प्रभागांतून 75 उमेदवारांची निवड करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. मात्र त्यातही अडचणी अशी आहे की, या उमेदवारांची निवड करताना इच्छुकांची नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे. कारण सर्वांनाच उमेदवारी देणे शक्य नसल्याने काहींना स्पष्ट नकार द्यावा लागणार आहे. ही नाराजी ओढावून घेणं परवडणारं नसल्याने काहीजण कमिटीपासून चार हात लांब राहण्याची भूमिका ठेवत आहेत, अशी चर्चा आहे.

Sanjay Raut Latest News
Nandurbar illegal churches : नंदुरबारमध्ये 199 बेकायदा चर्च ! आदिवासी धर्मांतर चौकशीचे बावनकुळेंचे आदेश

दरम्यान यासंदर्भात बोलताना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांनी पक्षाचा झालेला मेळावा, त्याचे नियोजन यासह काही कारणांनी कमिटी स्थापन होण्यास विलंब झाला आहे असे सांगितले आहे. खासदार संजय राऊत आठवडाभरात पुन्हा जळगाव दौऱ्यावर येणार आहेत, तेव्हा कोअर कमिटी अंतिम करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com