Sanjay Raut politics: संजय राऊत यांचा संताप, म्हणाले, माणिकराव कोकाटे, दादा भुसे हे मंत्रीमंडळात आहेतच कसे?

Sanjay Raut: MP Sanjay Raut makes serious allegations of land scam against Deputy Chief Minister Eknath Shinde -शिवसेना नेते संजय राऊत यांचा फमुख्यमंत्र्यांवर राजकीय हल्ला, म्हणाले, मुख्यमंत्री घोटाळेबाज मंत्र्यांना संरक्षण देतात!
Sanjay Raut Devendra Fadanvis
Sanjay Raut Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा महायुती सरकारवर आरोपांच्या फेरी झाडल्या. ते म्हणाले, या सरकारमध्ये अनेक मंत्री भ्रष्ट आहेत. या मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचे काम सुरू आहे.

खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीही महायुती सरकारमधील विविध मंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यात विविध मंत्र्यांचा समावेष आहे. त्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. ते म्हणाले, माणिकराव कोकाटे, दादा भुसे, संजय शिरसाठ, संजय राठोड अशा विविध मंत्र्यांवर गंभीर आरोप आहेत. या मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र फडणवीस त्यांना संरक्षण देतात.

ते म्हणाले, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याऐवजी जन्मठेप देण्याचे काम होते आहे. समज देऊन अन् खाते बदलून मंत्र्यांना सांभाळले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट आणि अकार्यक्षम मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना संरक्षण देण्याचे काम करतात. त्यामुळेच विविध भ्रष्ट मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत.

Sanjay Raut Devendra Fadanvis
Ajit Pawar Controversy: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाने वाढणार जिल्हा बँकांच्या अडचणी?

नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणात निर्णय घेतला आहे. यामध्ये सिडकोची पाच हजार एकर जमीन बिवलकर कुटुंबीयांना देण्यात आली.

या प्रकरणात पन्नास हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. खास हे प्रकरण घडविण्यासाठी सिडकोतील अनुकूल नसलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. पंचवीस दिवसांसाठी संजय शिरसाट यांना सिडकोचे अध्यक्ष करण्यात आले. या कालावधीत शिरसाठ यांनी बीवलकर यांना जमीन देण्याचा निर्णय घेतला.

गेली तीस वर्ष सिडको संबंधित जमीन बीवलकर कुटुंबीयांची नाही हे सांगत आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला देखील सुरू आहे. उच्च न्यायालयाने देखील हीच भूमिका मांडली होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी तब्बल पाच हजार एकर जमीन बिवलकर कुटूंबियांना देण्याचे काम अत्यंत घाई गडबडीत केले आहे. त्यात काय दडलंय याची चौकशी झाली पाहिजे.

अनेक प्रकल्पग्रस्त नागरिक आणि प्रकल्प बाधित जमिनीचा तुकडा मिळावा म्हणून संघर्ष करीत आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकाच कुटुंबाला पाच हजार एकर जमीन कोणत्या हेतूने दिली, हे जगजाहीर आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील बोट दाखवले जात आहे. याबाबत गृहमंत्री अमित शहा यांना देखील पुराव्यांसह पत्र लिहिले असल्याचे राऊत म्हणाले.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com