Shivsena UBT News: धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्ष उमेदवार देणार होता. मात्र पक्षाने अचानक वेगळा निर्णय घेत स्थानिक इच्छुक आणि नेत्यांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सहकारी पक्ष याबाबत काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मात्र तो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आता घटक पक्षांनी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज धुळे शहर मतदार संघातून लोकसंग्राम पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांना पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काल सायंकाळी माजी आमदार गोटे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अंतिम टप्प्यातील चर्चा झाली.
आज सकाळी गोटे यांनी समाज माध्यमांवर याबाबतची घोषणा केली होती. धुळे शहर मतदार संघात सध्या एमआयएम पक्षाचे फारुक शाह आमदार आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने अनुप अग्रवाल यांना उमेदवारी दिली आहे. वंचित आघाडीने जितेंद्र शिरसाठ यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाकडून या जागेवर पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शरद पाटील आणि डॉ सोनवणे इच्छुक होते. गेल्या आठवड्यात खासदार राऊत यांनी धुळे शहराचा दौरा केला होता. यावेळी धुळे जिल्ह्यातील राजकीय आढावा घेण्यात आला.
यामध्ये धुळे शहर हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात येईल, असे संकेत होते. यावेळी खासदार राऊत आणि माजी आमदार गोटे यांच्यात दोन तास बंद दारा चर्चा झाली. महाविकास आघाडीचा अन्य सहकारी पक्षांना सांभाळून घेण्याचे धोरण आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाच्या वाट्याला आलेली ही जागा माजी आमदार गोटे यांना देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस त्यांना मिळालेल्या काही जागांपैकी समाजवादी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला काही मतदारसंघ सोडणार आहे.
आज माजी आमदार गोटे यांना हा मतदारसंघ सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले. त्यांनी या संदर्भात वरिष्ठ नेत्यांकडे आपली नाराजी कळवली. मात्र पक्षाचा निर्णय म्हणून गोटे यांच्या उमेदवारीला संमती देण्यात आली आहे.
धुळे शहर मतदार संघात यंदा भाजप, एमआयएम, शिवसेना ठाकरे पक्ष यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. अन्य कोण मतदार संघात उमेदवार देतो याची उत्सुकता आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.