Eknath Shinde politics; शिवसेनेच्या मंत्र्यांचा एकनाथ शिंदेंना चिमटा की गुदगुल्या?, म्हणाले...

Sanjay Shirsath; Shivsena minister says,Good days have come for rickshaw mens-सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत केले विधान
Eknath Shinde & Sanjay Shirsath
Eknath Shinde & Sanjay ShirsathSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsath News: चाळीस आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे सध्या उपमुख्यमंत्री आहेत. यापूर्वी ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे ते सातत्याने राजकीय चर्चेचे केंद्र राहिले आहे. आता त्यांच्याच सहकारी मंत्र्यांनी केलेल्या विधानाने त्यांच्या विधानाची पुन्हा चर्चा होत आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते संजय शिरसाठ नुकतेच येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचा आमदार किशोर दराडे यांनी संपत्ती सत्कार केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मंत्री शिरसाठ यांनी केलेले विधान चर्चेचा विषय बनले आहे.

Eknath Shinde & Sanjay Shirsath
Devendra fadnavis Politics: नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन निश्चित? हे आहे कारण...

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्याचे समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, आम्ही सर्व शिवसेनेतून बाहेर पडलो. त्यामुळे आमचा फायदाच झाला. जे आमच्या सोबत आले त्यांना विविध पदे मिळाली. सत्तेत सहभागी होत आले. जे आले नाहीत, त्यांचे हाल झाले. त्यामुळे आम्ही जो काही निर्णय घेतला तो निर्णय योग्य झाला, असा दावा त्यांनी केला.

Eknath Shinde & Sanjay Shirsath
Shivsena Shinde politics: ठाकरे गटाला धक्का, माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या गोटात!

यावेळी ते म्हणाले, मी काही टाटा- बिर्ला किंवा विखे पाटलांच्या घरात जन्माला आलेलो नाही. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी अतिशय साधारण कुटुंबातून पुढे आलो आहे. माझ्यात क्षमता होती, म्हणून पक्षाने मला संधी दिली. त्यामुळेच मला राजकारणात मोठी संधी मिळाली. राजकारणात पुढे जाण्यासाठी मला कोणत्याही गॉडफादरची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ते म्हणाले, सध्या अडीच वर्षांसाठी मंत्र्यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर त्यांची कार्यक्षमता आणि आढावा घेऊन पुढे संधीचा विचार होईल. मात्र सध्या राजकारणाचा विचार करता रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले आहेत, असा चिमटा त्यांनी घेतला.

बाभुळगाव (येवला) येथील एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात आमदार दराडे यांनी सामाजिक न्याय मंत्री शिरसाठ यांचा सत्कार केला. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com