Nashik Mahant Sudhirdas : हिंदी मराठीच्या वादात आता संस्कृतची उडी, नाशिकच्या महंतांनी केली मोठी मागणी

Nashik Mahant Sudhirdas urges Sanskrit language inclusion in Maharashtra school curriculum : हिंदी मराठी भाषेवरुन वाद सुरु असतानाच महंत सुधीरदास यांनी केलेली ही मागणी चर्चेचा विषय ठरत आहे. या मागणीमुळे हिंदी मराठी भाषेच्या वादात संस्कृतीची एन्ट्री झाली आहे.
Nashik Mahant Sudhirdas
Nashik Mahant Sudhirdassarkarnma
Published on
Updated on

Sanskrit language demand : हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य करण्यासाठी शासन आदेश निघाल्यानंतर त्यावरुन वाद-प्रतिवाद सुरु आहे. हिंदी भाषिकांनी याचे स्वागत केले असले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सनेने सरकारच्या या निर्णयाला मात्र कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी ही सक्ती आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देताच वादाची ठिणगी पडली.

राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय तसेच विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत असतानाच नाशिकच्या महंतानी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास यांनी शालेय शिक्षणात संस्कृत भाषा अनिवार्य करावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Nashik Mahant Sudhirdas
Raj Thackeray Exit: मुंबईची काढून नाशिकची जबाबदारी अन् राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर, नाशिकला काय घडले?

महंत सुधीरदास यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही मागणी केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संस्कृत ही राष्ट्र भाषा असावी अशी मागणी संसदेकडे केली होती. त्यामुळे हिंदी - मराठी भाषेवरुन सुरु असलेला वाद टाळण्यासाठी संस्कृत भाषा शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य केली पाहिजे. शालेय पातळीवर संस्कृतचे अद्ययन सुरु झाल्यास सुसंस्कारी असे विद्यार्थी तयार व्हायला मदत होईल असं त्यांनी म्हटलं आहे.

शालेय अभ्यासक्रमात संस्कृत भाषा अनिवार्य करावी अशी विनंतीच महंत सुधीरदास यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. हिंदी मराठी भाषेवरुन वाद सुरु असतानाच महंत सुधीरदास यांनी केलेली ही मागणी चर्चेचा विषय ठरत आहे. महंत सुधीरदास महाराज यांनी केलेल्या या मागणीमुळे हिंदी मराठी भाषेच्या वादात संस्कृतीची एन्ट्री झाली आहे.

Nashik Mahant Sudhirdas
Vijaykumar Gavit Vs Chandrakant Raghuvanshi : नंदुरबारमध्ये गावित विरुद्ध रघुवंशी वादाचा पुन्हा भडका, राजकीय अस्तित्वाच्या लढाईत कोण मारणार बाजी?

वादाची ठिणगी पडली कुठून?

राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. असा शासन आदेश निघाल्यानंतर यावर पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिली. त्यांनी एक्स पोस्ट करत सरकारचा समाचार घेतला.

'मी स्वच्छ शब्दांत सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? असा सवालच राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तेथूनच या वादाची सुरुवात झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com