Ajit Pawar politics: नरेंद्र पाटील यांनी मुंडे प्रकरणात अजित पवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले!

Santosh Deshmukh murder case; Narendra Patil demands resignation Dhananjay Munde-नरेंद्र पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही.
Ajit Pawar & Narendra Patil
Ajit Pawar & Narendra PatilSarkarnama
Published on
Updated on

Narendra Patil News: मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अद्यापही चर्चेत आहे. या प्रकरणावर आता नरेंद्र पाटील यांनी बॅटिंग केली आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच लक्ष्य केले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील नुकतेच नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर परखड मत व्यक्त केले. यासंदर्भात त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी स्पष्ट मागणी केली.

Ajit Pawar & Narendra Patil
Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांना आव्हान, येवल्यात होणार विधानसभेचे टेस्ट वोटिंग!

यावेळी पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील थेट प्रश्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष धनंजय मुंडे यांचा बचाव का करीत आहे. असा प्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचा राजीनामा यापूर्वीच घ्यायला हवा होता.

Ajit Pawar & Narendra Patil
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस खुष, का केलं स्वागत?

महाराष्ट्रात राजकारणात एक मोठी परंपरा आहे. त्या परंपरेला धनंजय मुंडे छेद देव पाहत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या संदर्भात मोठी जबाबदारी आहे. ते या जबाबदारी पासून लांब जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

मंत्री मुंडे यांनी बीड मधील सरपंच हत्या प्रकरणासह अन्य आरोपांबाबत तातडीने राजीनामा दिला पाहिजे. त्यामुळे निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर येईल. ते निर्दोष असल्यास हवे तर त्यांनी पुन्हा पहाटेच शपथविधी घ्यावा, असा टोमणाही त्यांनी मारला. मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आरोप होताच राजीनामे दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.

मंत्री मुंडे राजीनामा प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील जनतेचे मत प्रतिकूल बनत चालले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता या प्रश्नावर निर्णय घेतला पाहिजे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात निश्चितच निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असे ते म्हणाले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com