Raj Thackrey Politics: राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस खुष, का केलं स्वागत?

Raj Thackrey; Thackrey questioned on EVM, Balasaheb Thorat comments-काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कसे पराभूत होऊ शकतात, असा प्रश्न राज ठाकरे यांनी आज उपस्थित केला
Raj Thackeray & Balasaheb Thorat
Raj Thackeray & Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackrey News: सामान्यत: राज ठाकरे आणि काँग्रेस यांचे फारसे जमत नाही. राज ठाकरेंच्या बहुतांशी राजकीय धोरणांना काँग्रेसची शहमती नसते. मात्र आज राज ठाकरे यांच्या विधानाचे काँग्रेसनेही कौतुक केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आपल्या सडेतोड वक्तव्याबाबत प्रसिद्ध आहेत. त्यांची राजकीय भूमिका अनेकांना पसंत नसते. मात्र आज ठाकरे यांनी ज्या विषयाला हात घातला. त्याची महाराष्ट्रात सगळीकडेच चर्चा सुरू आहे.

Raj Thackeray & Balasaheb Thorat
Mahakumbh Mela Stampede : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, ‘यशदा’चा ‘तो’ अहवाल ठरला असता संकटमोटक?

आज राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जे लोक निवडून आले आहेत. त्यांनाही आपण निवडून कसे आलो यावर विश्वास नाही. अनेकांनी याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत, असे ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray & Balasaheb Thorat
Eknath Shinde Politics: गिरीश महाजनांच्या वाटेत एकनाथ शिंदेंच्या रायगडचा घाट!

संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा मोठा संपर्क आणि काम आहे. गेल्या सात निवडणुकांमध्ये ते मोठ्या मताधिक्याने विजयी होत आले आहेत. मात्र यंदा त्यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला.

आज बाळासाहेब थोरात पराभूत झाले आहेत. उद्या त्यांना मतदान करणारा पराभूत होईल, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला. हा सबंध महाराष्ट्रालाच पडलेला प्रश्न आहे, असे ते म्हणाले. श्री. ठाकरे यांनी अनेकांच्या मनातील हा प्रश्न उपस्थित केल्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भावना आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’ घोटाळ्याबाबत सर्व विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे समाधानकारक उत्तर निवडणूक आयोगाकडून मिळालेले नाही. विशेषता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत ९६ लाख मतदारांची संख्या वाढली. हे सप्रमाण मांडले होते.

आज राज ठाकरे यांनी केलेल्या विधानामुळे ‘ईव्हीएम’ विरोधातील आंदोलनाला बळ मिळणार आहे. त्यामुळे ठाकरे यांच्या या वक्तव्याचे काँग्रेसच्या नेत्यांनीही स्वागत केले आहे. काँग्रेस नेते थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात तर ठाकरे यांच्या त्या वक्तव्याचे व्हिडिओ आणि पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आली. त्याला मोठ्या प्रमाणावर लाईक्स देखील मिळाल्या.

मनसे प्रमुख ठाकरे सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यासाठी त्यांचा विविध भागात दौरा झालेला आहे. मध्यंतरी सातत्याने ठाकरे हे महायुतीच्या बाजूने असल्याची चर्चा पसरवली जात होती. त्याबाबत च्या बातम्या देखील सातत्याने कानावर येतात. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे आजचे विधान भारतीय जनता पक्षालाही धक्का देणारे आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com