Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळांना आव्हान, येवल्यात होणार विधानसभेचे टेस्ट वोटिंग!

Chhagan Bhujbal; NCP Sharad Pawar candidate Manikrao Shinde, EVM mock pole-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माणिकराव शिंदे यांचे माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या निवडीला आव्हान दिले आहे.
Manikrao Shinde & Chhagan Bhujbal
Manikrao Shinde & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: सध्या चर्चेत असलेले माजी मंत्री छगन भुजबळ यांना एका नव्या परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. येवला मतदार संघातील त्यांच्या निवडीला आव्हान देण्यात आले आहे. त्यावर निवडणुक अधिकाऱ्यांनी निकाल दिला.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत येवला मतदारसंघातून छगन भुजबळ विजयी झाले होते. त्यांच्या निकालाला प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड माणिकराव शिंदे यांनी आव्हान दिले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे याबाबत सुनावणी झाली.

Manikrao Shinde & Chhagan Bhujbal
Raj Thackrey Politics: राज ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर काँग्रेस खुष, का केलं स्वागत?

यासंदर्भात आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आपला निकाल दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार ॲड शिंदे यांच्या मागणीनुसार येत्या २४ फेब्रुवारीला येवला मतदार संघातील एका मतदान केंद्रावर ईव्हीएम यंत्रावर मॉकपोल घेण्यात येणार आहे. त्यामुळे येवला मतदार संघातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.

Manikrao Shinde & Chhagan Bhujbal
Eknath Shinde Politics: गिरीश महाजनांच्या वाटेत एकनाथ शिंदेंच्या रायगडचा घाट!

येवला मतदारसंघातून माजी मंत्री भुजबळ यांना यंदा विरोधाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीत मनोज जरांगे पाटील फॅक्टर चांगलाच सक्रिय होता. त्यामुळे भुजबळ यांना यंदा जास्त परिश्रम घ्यावे लागले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे भुजबळ यांना १,३५,०२३ मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ॲड माणिकराव शिंदे यांना १,०८,६२३ मते मिळाली होती. निवडणुकीत झालेल्या मतदानाबाबत ॲड शिंदे यांनी शंका व्यक्त केली होती.

राज्यातील निवडणुकीत अनेक मतदारसंघातून ईव्हीएम मतदान यंत्राबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. राज्यात सत्तावीस पराभूत उमेदवारांनी निकालाला आव्हान दिले आहे. या पार्श्वभूमीवर आता येवला मतदारसंघात छगन भुजबळ यांनाही मतदानाच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे.

निवडणूक निकालानंतर भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे पक्षनेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सध्या त्यांचा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर येवल्यात मग पोल होत आहे. या मतदान चाचणीचा निकाल काय लागतो, याबाबत सगळ्यांनाच मोठी उत्सुकता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com