Sharad Pawar on Modi : नाशिकचं पाणी शरद पवारांनी पेटवलं; पंतप्रधानांची कोंडी

Narendra Modi News : मतदारांना भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार यांच्याकडे वळविण्याचा विशेष प्रयत्न केला. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. असे सभेला उपस्थित राहिलेल्या मतदारांचा कल पाहून म्हणता येईल.
Sharad Pawar, Narendra Modi
Sharad Pawar, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Sharad Pawar News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सतत शरद पवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. बुधवारी शरद पवार आणि नरेंद्र मोदी दोघांनीही नाशिकमध्ये प्रचार सभा घेतली.

शेती शेतकरी आणि कांदा हे प्रश्न नाशिकसाठी संवेदनशील राजकीय समस्या आहे. प्रत्येक निवडणुकीत त्यावर चर्चा होते. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाची यंदाची निवडणूक फक्त शेतीच्या प्रश्नावरच होत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. विशेषतः दिंडोरीच्या उमेदवारासाठी या प्रश्नामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पिंपळगाव बसवंत येथे सभा घेतली होती.

या सभेत त्यांनी मतदारांना भाजपाच्या उमेदवार डॉ भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्याकडे वळविण्याचा विशेष प्रयत्न केला. त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले. असे सभेला उपस्थित राहिलेल्या मतदारांचा कल पाहून म्हणता येईल.

मात्र, शरद पवार यांच्या सभेतील भाषण भाजपचा अचूक वेध घेणारे ठरले. पवार यांनी आपल्या सभेत कांदा प्रश्नावर बोलणे टाळले मात्र गुजरातला जाणारे पाणी नाशिकच्या शेतीसाठी वळविण्याच्या प्रश्नावर ते बोलले. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविल्यास गुजरातला जाणारे पाणी नाशिकच्या शेतीला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील भावना व्यक्त झाल्या.

Sharad Pawar, Narendra Modi
PM Modi : 'बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे' ; मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला!

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ते मर्मावर बोट ठेवण्यासारखा प्रकार होता. गुजरातला जाणारे पाणी अन्यत्र वळविणे, हा विषय म्हणजे पंतप्रधान मोदी यांची अडचण करणारा प्रकार. थोडक्यात पंतप्रधान मोदी यांना निरुत्तर करणारा विषय होता. तेच शरद पवार यांनी केले. त्यामुळे एक प्रकारे पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या सभेला शरद पवार यांनी आपल्या खास शैलीतून उत्तर दिले अशी स्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ आणि उमेदवार डॉक्टर भारती पवार (Dr. Bharati Pawar) या तिघांनीही या विषयावर भाष्य केले होते. मांजरपाडा प्रकल्प काही प्रमाणात पूर्ण झाला आहे.

त्याचे श्रेय फडणवीस आणि मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) आपला असल्याचा दावा या दोन्ही नेत्यांनी केला. उमेदवार डॉक्टर पवार यांनी याबाबत केंद्र आणि राज्यातील सरकार काम करीत असल्याचे सांगितले. मात्र पंतप्रधानांच्या भाषणात त्याचा उल्लेख नव्हता.

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणे याचा राजकीय अर्थ अतिशय स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी तो संवेदनशील विषय आहे. त्यावर विधान करून पंतप्रधान मोदी यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला. त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाले, असे म्हणता येईल. त्याचा दिंडोरी मतदार (Dindori Constituency) संघाच्या मतदारांवर काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होईल.

Sharad Pawar, Narendra Modi
Shyam Rangeela News : मोदींविरुद्ध निवडणूक लढवण्याचं स्वप्न भंगलं; अर्ज फेटाळल्यानंतर श्याम रंगीला भावूक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com