PM Modi : 'बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे' ; मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला!

Bhiwandi and Kalyan Constituency : ओबीसी, दलित, आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव, असल्याचा आरोपही केला.
PM Modi
PM ModiSarkarnama

Losksabha Election 2024 : महायुतीचे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील व कल्याणमधील उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान-व्हर्टेक्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा झाली. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर जोरदार टीका केली. तसेच, शरद पवार गट आणि ठाकरे गटावरही निशाणा साधला.

'नेहरूंच्या काळापासून 2014पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब... अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे.' असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या शहजादेंविरोधात नकली शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने तोंडाला कुलूप व डोळ्यावर पट्टी बांधली आहे, अशी जोरदार टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
PM Narendra Modi Rally : नकली शिवसेना ते बजेटचे तुकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजपाचे आमदार गणेश नाईक, किसन कथोरे, शिवसेनेचे विश्वनाथ भोईर, मनसेचे आमदार राजू पाटील, भाजपाचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

कल्याणमधील दुर्गादेवी, तिसाई आणि अंबरनाथच्या महादेवाला प्रणाम करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरूवात करून उपस्थितांची दाद मिळवली. इंडी आघाडीकडून हिंदू-मुस्लिम असा खेळ केला जात आहे. परंतु, मोदींकडून हिंदू-मुस्लिम वाद केला जात असल्याचा आरोप ते करतात, मात्र मोदी हा खेळ खेळणाऱ्यांना उघडं पाडत आहे. असं मोदी म्हणाले.

तसेच 'ओबीसी, दलित आणि आदिवासींचे आरक्षण कमी करून मुस्लिमांना देण्यासाठी कॉंग्रेसने कर्नाटक ही प्रयोगशाळा केली आहे. कर्नाटकात सत्ता मिळाल्यावर एका रात्रीत ओबींसीचे आरक्षण मुस्लिमांना दिले गेले. देशात अशाच पद्धतीने मुस्लिमांना आरक्षण दिले जाण्याचा डाव आहे. `वोट जिहाद' घडविले जात आहे. मात्र, त्याचा महाराष्ट्रातील इंडी आघाडीच्या एकाही नेत्याने विरोध केला नाही, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले.

PM Modi
Narendra Modi News : कांद्याच्या राजधानीत पीएम मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, पाच वर्षात...

याशिवाय कॉंग्रेसकडून दहशतवादाचे समर्थन केले जात असून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सांगणारेही कॉंग्रेसचा कुर्ता धरून उभे आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकली शिवसेनेवर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या महानतेबाबत शहजादेंना पाच वाक्य बोलण्यास सांगावे, असे आव्हानही नरेंद्र मोदी यांनी दिले.

त्याचबरोबर विकसित भारत घडविण्यासाठी पहिल्या १०० दिवसांत ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात येणार आहे. त्यात देशातील युवकांचा सहभाग असावा, यासाठी आणखी २५ दिवसांचा कालावधी वाढवून युवकांना नाविन्यपूर्ण कल्पना पाठविण्याचे आवाहन केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com