Nashik Political News : सरपंच, उपसरपंचासह ११ सदस्य अपात्र; अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने खळबळ

Nashik Political News : पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सरपंचासह सदस्यांची धावाधाव सुरू
Lohner Grampanchayat
Lohner GrampanchayatSarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील लोहणेर ही मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांसह ११ सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. या निर्णयामुळे गावासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आता पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी सरपंचासह सदस्यांची धावाधाव सुरू झाली आहे. (Latest Political News)

मालेगावचे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी ४ ऑक्टोबर २०२३ रोजी हा निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार लोहणेरचे तत्कालीन सरपंच रतिलाल बन्सीलाल परदेशी व उपसरपंच विजया दत्तात्रेय मेतकर यांच्यासह इतर ११ सदस्यांनी गावातील मिळकतीची घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी ५ मे २०२१ रोजी त्यांना कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावली होती.

यानंतर तीन महिन्यांत म्हणजेच ३ ऑगस्ट २०२१ पर्यंत त्यांनी हा कर भरणा करणे अपेक्षित होते; परंतु विहित मुदतीत कर भरणा केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात लोहणेर गावातील रहिवासी समाधान महाजन यांनी मालेगावच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपात्रतेसंदर्भात याचिका दाखल केली होती. (Maharashtra Political News)

Lohner Grampanchayat
Ahmednagar Congress News : एकेकाळी वर्चस्व असलेल्या नगर जिल्ह्यातच काँग्रेसपुढे आव्हानांची मालिका ?

अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जाचा विचार करून या सदस्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या आधारे वेळोवेळी सुनावणी घेऊन ग्रामपंचायतीचे सरपंच रतिलाल परदेशी उपसरपंच विजया मेतकर व सदस्य दिलीप भालेराव, दीपक बच्छाव, सतीश सोमवंशी, पूनम पवार, उषाबाई सोनवणे, भाऊसिंग गायकवाड, धोंडू अहिरे, सविता शेवाळे, रेश्मा महाजन अशा ११ जणांनी विहित मुदतीत कर भरणा न केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे यापुढील काळात त्यांना ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच व उपसरपंच म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचा निर्णय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

दरम्यान, लोहणेर ग्रामपंचायतीत मार्च २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण १७ सदस्य निवडून आले. अपात्रतेचा अर्ज दाखल झाला तेव्हा बन्सीलाल परदेशी हे सरपंच व विजया मेटकर या उपसरपंच होत्या. आवर्तन पद्धतीनुसार त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर दुसऱ्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यापैकी ११ सदस्य अपात्र ठरल्याने कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपले सदस्यत्व वाचवण्यासाठी आता ग्रामपंचायत सदस्यांची धावाधाव सुरू झाली आहे. त्यांना येत्या १५ दिवसांत अपर आयुक्तांकडे अपील करण्याची मुदत देण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Lohner Grampanchayat
Barshi Politics : राजेंद्र राऊतांचा धडाका, तर दिलीप सोपलांच्या गोटात शांतता; बार्शीच्या राजकारणात नेमकं घडतंय काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com