
Satana APMC Twist : सटाणा बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होता होता अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत यशवंत शेतकरी विकास पॅनलने ९ जागा जिंकून बहुमत सिद्ध केले होते. त्यांना शेतकरी विकास पॅनलच्या एका संचालकाचा पाठिंबा मिळाल्याने सत्ता स्थापन होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र आता त्यात आता एक नवा ट्विस्ट समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा बाजार समितीच्या सभापती उपसभापती पदाच्या निवडीसाठी सोमवारी बैठक बोलविण्यात आली होती. मात्र नवनिर्वाचित संचालक मंडळाची विशेष बैठक गणपूर्ती अभावी स्थगित झाली. बाजार समितीच्या इतिहासात पंचवार्षिक निवडणुकीनंतर सभापती उपसभापती पदासाठी बोलावलेली पहिलीच बैठक रद्द होण्याची ही पहिलच वेळ ठरली. या निवडणुकीने आता नाट्यमय वळण घेतलं आहे.
सत्ताकेंद्राच्या अंतर्गत संघर्षामुळे गणपूर्ती अभावी बैठक तहकूब करण्यात आली. यशवंत शेतकरी पॅनलमधील नेत्यांमध्ये एकमत न झाल्याने पॅनलचे ८ व शेतकरी विकास पॅनलचा १ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे आवश्यक कोरम न भरल्याने निवड प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली.
१ एप्रिलला या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्या दिवसापासून यशवंत शेतकरी विकास पॅनलचे निवडून आलेले ९ उमेदवार सहलीसाठी गेले होते. रविवारी रात्री ते परतले, मात्र सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला पॅनलमधील नेत्यांमध्ये गटबाजी समोर आली. सभापती -उपसभापती निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रोसिडिंग पुस्तकात १८ संचालकांपैकी सभागृहात फक्त ९ संचालकांनी हजेरी लावली व स्वाक्षरी केली. उर्वरित संचालक सभागृहात बैठकीला आलेच नाहीत. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत गणपूर्ती अभावी विशेष बैठक स्थगित करण्यात आली.
बाजार समितीच्या सभापतीपदासाठी रविंद्र सोनवणे आणि माजी जि.प. सदस्या सिंधु सोनवणे या दोघांची नावे आघाडीवर होती. माजी सभापती संजय सोनवणे, डॉ. प्रशांत सोनवणे आणि गजेंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या. मात्र रवींद्र सोनवणे यांचा ठाम आग्रह व संजय सोनवणे यांचा पत्नी सिंधुताई यांना सभापती करण्याचा आग्रह होता त्यामुळे एकमत होऊ शकले नाही. तब्बल २२ दिवस निवडणूक होऊन झाले समीतीचे कारभारी नियुक्त करणे गरजेचे बनले असताना या घडामोडींमुळे बाजार समितीच्या निवडणुकीने वेगळं वळण घेतलं आहे. यामुळे तालुक्यात राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे संचालक सिंधूताई सोनवणे (डांग सौंदाणे), राहुल सोनवणे (सटाणा), दिनेश गुंजाळ (तिळवण), गणेश ठाकरे (भावनगर), दीपक रौंदळ (तरसाळी), निंबा वानले (ठेंगोडा), काळू जाधव (शेमळी), मनोहर बिरारी (कंधाने), यांच्यासह शेतकरी विकास पॅनल मधून निवडून आलेले किशोर खैरनार (वनोली) हे सभापती उपसभापती निवडीसाठी सभागृहात पोहोचले नाहीत
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.