Dilip Borse Politics: भाजपच्या आमदार दिलीप बोरसे यांची स्थिती "गड आला पण सिंह गेला", राहुल पाटील ठरले वरचढ!

Satana MuniCipal Council: BJP's EML Dilip Borse wins, but Shiv Sena's Harshada Patil wins the Mayor's post-सटाणा नगरपरिषदेवर बहुमत भाजपचे मात्र नगराध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या हर्षदा पाटील
Rahul Patil, Harshda Patil & Dilip Borse
Rahul Patil, Harshda Patil & Dilip BorseSarkarnama
Published on
Updated on

Satana Municipality News: सटाणा नगरपालिका निवडणुकीत भाजपला अनपेक्षित धक्का बसला. आमदार दिलीप बोरसे यांना नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली. त्यामुळे हा निकाल भाजपसाठी धक्का देणारा ठरला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत २४ जागांपैकी १५ जागा भाजपने पटकावल्या. आमदार दिलीप बोरसे यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या राहुल पाटील यांनी आव्हान उभे केले होते. त्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष वरचढ ठरला.

सटाणा नगरपालिका निवडणुकीत यंदा मोठी चुरस होती. आमदार दिलीप बोरसे यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार असे जाहीर केले होते. त्यांच्या विरोधात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते.

Rahul Patil, Harshda Patil & Dilip Borse
Sinnar Election Result : सिन्नरमध्ये खासदार वाजेंना धक्का, माणिकराव कोकाटेंचा 'विठ्ठल' विजयी

निवडणुकीत स्थानिक प्रश्न ऐरणीवर आले होते. विशेषता सार्वजनिक आरोग्य आणि वाढणारी घरपट्टी या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले. भाजपला अडचणीत आणण्यासाठी सर्व पक्षांनी विविध डावपेच आखले होते. त्यावर भाजपने मात केली.

Rahul Patil, Harshda Patil & Dilip Borse
Suhas Kande Politics: नांदगावला सुहास कांदे यांचाच डंका; समीर भुजबळ यांना धक्का, सर्व जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी!

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या हर्षदा राहुल पाटील या विजयी झाल्या. त्यांना दहा हजार ३०७ मते मिळाली. त्यांनी भाजपच्या योगिता मोरे यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. अपक्ष रूपाली कोठावदे यांच्या उमेदवारीचाही भाजपला फटका बसला.

आमदार बोरसे यांच्या भाजपच्या पॅनलला सर्वाधिक १५ जागा मिळाल्या. शिवसेना शिंदे पक्षाला चार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला अवघी एक जागा मिळाली. जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. भाजपला बहुमत मिळूनही नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली. त्यामुळे आमदार बोरसे यांची स्थिती "गड आला पण सिंह गेला" अशी झाली.

भाजपचे विजयी उमेदवार असे, सुनंदा देवरे, मुल्ला रऊफ खलील शाह, लताबाई बच्छाव, मनीषा पोकळे, विलास दंडगव्हाळ, हर्षवर्धन सोनवणे, चेतन मोरे, प्रतिभा खैरनार, सोनाली बेताडे, महेश सोनवणे, चेतन रौंदळ, सुमित वाघ आणि सीमा सोनवणे.

अन्य विजयी उमेदवारांमध्ये मनीष जयवंत पवार, कल्पना सोनवणे अलका बोरसे आणि मंगेश विजय खैरनार हे अपक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे झुमेरा यासीन शेख आणि शिवसेना शिंदे पक्षाचे जयश्री गरुड, भूषण सोनवणे, तनुजा नांद्रे आणि राहुल पाटील यांचा समावेश आहे.

---------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com