Satyajeet Tambe meet Piyush Goyal : आमदार सत्यजित तांबेंनी दिल्लीत घेतली मंत्री पीयूष गोयलांची भेट, केली 'ही' मागणी!

Satyajeet Tambe at Delhi News : सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी दिल्ली गाठली आहे.
Satyajit Tambe and Piyush Goyal
Satyajit Tambe and Piyush GoyalSarkarnama

Satyajeet Tambe Politics News: नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि बेरोजगार युवकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांकडे आमदार सत्यजित तांबे यांनी लक्ष वेधले आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली.

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे अनेक नेत्यांनी दिल्ली गाठली आहे. या निमित्ताने केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले जात आहे.

आमदार सत्यजित तांबे(Satyajeet Tambe) यांनीही या संधीचा लाभ घेतला. नाशिक जिल्ह्याच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषता रोजगार निर्मितीसाठी आवश्यक औद्योगिक क्षेत्राशी संबंधित निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Satyajit Tambe and Piyush Goyal
Ajit Pawar and Chhagan Bhujbal News: छगन भुजबळांनी मतदारसंघातील कामासाठी मागितला निधी अन् अजित पवारांनी..!

आमदार तांबे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल(Piyush Goyal ) यांची भेट घेतली. या भेटीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली. सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीचे प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. सिन्नर येथील इंडियाबुल प्रकल्पाला एसी झेडने दिलेली जमीन वापराविना पडून आहे. ती जमीन परत घेण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. मात्र ती संथ आहे, ही जमीन तातडीने परत घेऊन एमआयडीसीला वर्ग करावी. त्यामुळे नवीन रोजगार आणि उद्योगांना चालना मिळेल. असे आमदार तांबे यांनी सांगितले.

Satyajit Tambe and Piyush Goyal
Sharad Pawar News : महायुतीसाठी धोक्याची घंटा; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात?

कांदा निर्यात बंदी आणि कांदा निर्यातीसाठी आकारण्यात येणारे 40 टक्के निर्यात शुल्क त्रासदायक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मोठी झळ बसली आहे. त्यामुळे याबाबत वाणिज्य मंत्रालयाने वस्तुस्थितीचा विचार करून हे दोन्ही निर्णय मागे घ्यावेत, अशी मागणी देखील आमदार तांबे यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com